सेंट लुसिया West Indies Update Squad : वेस्ट इंडिज क्रिकेट संघात इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्याची उत्सुकता वाढली आहे. यजमान वेस्ट इंडिज सध्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेत 0-2 नं पिछाडीवर आहे.
CWI Announces Squad Changes for Crucial Final Leg of T20I Series Against England🏏 🌴
— Windies Cricket (@windiescricket) November 12, 2024
Read More 🔽 https://t.co/asa6JI2Hpw
रसेल बाहेर तर निलंबित खेळाडू संघात : वेस्ट इंडिजनं मालिकेच्या मध्यावर संघात केलेला बदल हा पहिल्या दोन T20 सामन्यातील पराभवाचा परिणाम आहे की आणखी काही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंद्रे रसेलबाबत असं बोललं जात आहे की तो दुखापतीमुळं बाहेर आहे. तसंच अल्झारी जोसेफवर लावण्यात आलेलं निलंबन आता संपुष्टात आल्यानं त्याला संघात परत बोलावण्यात आलं आहे.
A big blow for the West Indies ahead of the final three matches of their five-game T20I series against England.
— ICC (@ICC) November 13, 2024
Details 👇https://t.co/5phYBi24sD
अल्झारीवरील 2 सामन्यांची बंदी उठवली : अल्झारी जोसेफवर 2 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळंच तो मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर राहिला. आता त्याला शेमार जोसेफच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. आंद्रे रसेलच्या डाव्या घोट्याला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळंच तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित 3 सामने खेळणार नाही. त्याच्या जागी अष्टपैलू शमर स्प्रिंगरचा संघात समावेश करण्यात आला आहे. शमर स्प्रिंगर अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या T20 मालिकेत खेळताना दिसला होता.
डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर 3 सामने : इंग्लंडनं वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना 8 विकेट्सनं जिंकला होता, तर दुसऱ्या T20 सामन्यामध्ये 7 गडी राखून विजय मिळवला होता. आता तिसऱ्या T20 मध्येही त्यांनी विजय मिळवला तर मालिकाही त्यांचीच होईल, त्यामुळं कॅरेबियन संघाचं आता T20 मालिकेत पूर्ण पुनरागमन करण्याकडे लक्ष असेल. मालिकेतील शेवटचे 3 सामने डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर खेळवले जातील. हे तीन सामने जिंकूनच वेस्ट इंडिजला मालिका जिंकता येईल.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन T20 सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा संघ:
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, टेरेन्स हिंड्स, शाई होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, शेरफर्ड.
हेही वाचा :