ETV Bharat / state

अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न, माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा खळबळजनक दावा

अनिल देशमुखांच्या कथित 100 कोटी खंडणी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात कोणाला क्लीन चिट दिली नाही, असा खुलासा केला.

Justice Chandiwal On Anil Deshmukh
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 1:16 PM IST

मुंबई : अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी खंडणी प्रकरणात सचिन वाझे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. 100 कोटी खंडणी प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली. आता या प्रकरणात पुन्हा मोठी घडामोड पुढं आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी खंडणी प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे आध्यक्ष माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत न्यायमूर्ती चांदीवाल यांनी "आपण अहवालात क्लीन चिट कोणालाच दिली नाही. सचिन वाझे यांच्याकडं या प्रकरणातील बरंच मटेरियल होतं. मात्र त्यांनी ते सादर केलं नाही. सचिन वाझे आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पुरावे सादर केले नाहीत, त्यामुळे 100 कोटी खंडणी प्रकरणात काही घडलं नाही. पुरावे सादर केले असते, तर नक्कीच काही घडलं असतं," असा खळबळजनक दावा न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या मुलाखतीत केला.

आपल्या अहवालात कोणालाही क्लीन चिट नाही : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी खंडणी घोटाळ्यात त्यांनी बार आणि हॉटेल मालकाकडून खंडणी गोळा केल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझे यांच्या आरोपानं देशभर खळबळ उडाली. त्यामुळे तत्कालिन सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या नेतृत्वात आयोगाची स्थापना केली. या आयोगानं आपल्याला क्लिन चिट दिली असा, दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार केला. मात्र "आपल्या अहवालात आपण कोणालाही क्लीन चिट दिली नाही. उलट सचिन वाझे यांच्याकडं बरंच मटेरियल असूनही त्यांनी ते सादर केलं नाही. सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्या मुलानं 40 लाख रुपयाबाबत केलेला मेसेजही मला दाखवला, मात्र मी तो रेकॉर्डवर घेतला नाही," असंही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी यावेळी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. यावेळी या दोघांनी देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार यांची नावं घेतल्याची चर्चा होती. यावेळी बोलताना न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक दावा केला. या नावांचा संबंध नसल्यानं आपण ती रेकॉर्डवर घेतली नाही. सचिन वाझे आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शपथपत्र सादर केले, मात्र पुरावे सादर केले नाहीत. पुरावे सादर न केल्यामुळे या प्रकरणात काही घडलं नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

क्लिन चिट दिल्याचा अनिल देशमुखांचा दावा : अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुलीच्या प्रकरणानं देशभरात मोठी खळबळ उडाली. याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगानं आपल्याला क्लीन चिट दिली असा दावा केला. चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. आपल्याला क्लीन चिट देण्यात आल्यानंच चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यात येत नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. मात्र आता माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर पुन्हा हे प्रकरण तापलं आहे.

हेही वाचा :

  1. अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh
  2. "माझ्या विरोधात नवं कारस्थान रचण्यात आलं...", अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप - Anil Deshmukh
  3. Extortion Case वसुली प्रकरणात नंबर वन व्यक्ती नेमका कोण ? वाझेच्या जबाबाबात प्रथमदर्शनी विश्वासार्हतेवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.