ETV Bharat / technology

Hyundai Tucson ला भारतात NCAP क्रॅश सुरक्षा चाचणीत 5 स्टार

Hyundai टक्सन देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत सामील झाली आहे. या SUV नं इंडिया NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केलं आहे.

Hyundai Tucson
Hyundai टक्सन (ANI)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

हैदराबाद : Hyundai ची 5-सीटर टक्सन देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत सामील झाली आहे. या SUV नं इंडिया NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केलं आहे. Hyundai Venue ला ग्लोबल NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाल्यानंतर टक्सन हे HMIL च्या पोर्टफोलिओमध्ये 5 स्टार मिळवणारं दुसरं वाहन ठरलं आहे. India NCAP द्वारे चाचणी केलेली Hyundai Tucson हे 2.0-लिटर पेट्रोल AT Signature मॉडेल, 1828 kg च्या कर्ब वजनासह 2-रो 5-सीटर SUV आहे. या SUV ला प्रौढ आणि मुलांसाठी 5-स्टार स्कोअर मिळाले आहेत.

प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट : Hyundai Tucson च्या चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये सुरक्षेसाठी फ्रंट, साइड आणि पडद्याच्या एअरबॅग्ज तसंच सीटबेल्ट रिमाइंडरसह सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट समाविष्ट आहेत. सीटबेल्ट प्री-टेन्शनर आणि लोड लिमिटर देखील मानक सुरक्षा किटचा भाग होते. टक्सनमध्ये चाइल्ड सीट इन्स्टॉलेशनसाठी आउटबोर्ड सीट्सवर ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स देखील आहेत.

Hyundai Tucson ची भारत NCAP मध्ये कामगिरी : India NCAP नं घेतलेल्या सुरक्षा चाचणीत, Hyundai Tucson नं प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 32 गुणांपैकी 30.84 गुण मिळवले. टक्सनला फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर चाचणीसाठी 16 पैकी 14.84 गुण आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर चाचणीसाठी 16 पैकी 16 गुण मिळाले. अशा प्रकारे, 30.84 गुणांसह, टक्सननं प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये 5 स्टरा मिळवले.

बालकांच्या संरक्षणाच्या बाबतीत 42 गुण : दुसरीकडे, भारत NCAP बालकांच्या संरक्षणाच्या बाबतीत एकूण 49 गुण देते. Hyundai Tucson नं 49 पैकी 42 गुण मिळवले आहेत. यात चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 5 स्टार मिळाले. टक्सनने डायनॅमिक स्कोअरमध्ये 24 पैकी 24 गुण, CRS इंस्टॉलेशन स्कोअरमध्ये 12 पैकी 12 गुण आणि वाहन मूल्यांकन स्कोअरमध्ये 13 पैकी 5 गुण मिळवले आहेत.

Hyundai Tucson चे इंजिन आणि कार्यप्रदर्शन : Hyundai Tucson ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 29.02 लाख रुपये आहे. त्याच वेळी, टॉप मॉडेलसाठी त्याची एक्स-शोरूम किंमत 35.94 लाख रुपयांपर्यंत जाते. यात दोन पॉवरट्रेन पर्याय आहेत. पहिले 2.0-लिटर पेट्रोल आणि दुसरे 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे. 2.0-लिटर पेट्रोल 154 bhp ची कमाल पॉवर आणि 192 nm कमाल टॉर्क जनरेट करतं. हे 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. दुसरीकडं, 2.0-लिटर डिझेल इंजिन 184 bhp पॉवर आणि 416 Nm टॉर्क जनरेट करतं, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.

हे वाचलंत का :

  1. नवीन Audi Q7 भारतात 88.66 लाखात लॉंच, जाणून घ्या काय आहेत बदल..
  2. Kia Syros कारचा लाँच होण्याआधी नवीन टीझर रिलीज, पॅनोरमिक सनरूफ इतर फीचरची माहिती उघड
  3. महिंद्राच्या XEV 9e आणि BE 6e या दोन अलिशान कार लॉंच, जाणून घ्या फीचरसह किंमत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.