ETV Bharat / bharat

Honey Trap : कुरुलकरांना महिलेशी करायचा होता सेक्स; जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ

संरक्षण संशोधन संस्था पुणेचे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांना ३ मे रोजी अटक करण्यात आली होती. कुरुलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप व्हॉईस, मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 10, 2023, 8:45 PM IST

मुंबई : DRDOचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हनी ट्रॅप प्रकरणात शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान ज्या महिलेने प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅप अडकवले होते, त्या महिलेने भारतीय गुप्तचर खात्यातील कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही अडविण्याचा प्रयत्न केला होता. कुरुलकर यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली असून त्या गुप्तचर खात्यातील अधिकाऱ्याचा मोबाईल फोन एटीएसने ताब्यात घेतला आहे. शास्त्रज्ञ कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंट महिलेशी सेक्स करायचा होता. यामुळे कोणता प्रश्न न करता कुरुलकर हे त्या महिलेला माहिती देत होते.

जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ
जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ

एटीएस कोठडीची मुदत वाढवली : संरक्षण संशोधन संस्था पुणेचे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांना ३ मे रोजी अटक करण्यात आली होती. कुरुलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप व्हॉईस, मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली. कुरुळकर यांचा लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान अटक केल्यानंतर कुरुलकर यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने एटीएस कोठडी १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ
जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ

आधीच सुरू झाला होता तपास : हाती आलेल्या माहितीनुसार, डॉ.कुरुलकर यांना ३ मेला अटक करण्यात आली होती, परंतु DRDO च्या दक्षता पथकाने 24 फेब्रुवारीपासूनच डॉ. कुरुलकर यांच्याविरोधात तपास सुरू केला होता. त्याचदिवशी त्याच्याकडून दक्षता पथकाने तीन मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक डेस्कटॉप, पेन ड्राईव्ह जप्त केल्या होत्या. या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. तेथील रिपोर्ट आल्यानंतर ते सर्व पुरावे महाराष्ट्र एटीएस प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आले होते.

जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ
जाणून घ्या कसे अडकले शास्त्रज्ञ

२०२२ वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून होते संपर्कात: डॉ. कुरुलकर यांनी एटीएस यांना दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. त्यात त्यांना चुकीच्या नावावर संबोधण्यात आले. त्यानंतर कुरुलकर यांनी आपण ती व्यक्ती नाही, तर प्रदीप कुरुलकर असल्यास सांगितले. त्यानंतर त्या दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग सुरू झाली. त्यामुळे फोनवरील महिलेने आपण लंडनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते.

फेब्रुवारी २०२३ पर्यंत चॅटिंग होती सुरू : डॉ. कुरुलकर आणि त्या महिलेची चॅटिंग फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालू होती. डॉ. कुरुलकर यांच्याशी चॅट करण्यासाठी वापरलेल्या क्रमांकावर पाकिस्तानी आयपी होता. हे जेव्हा गुप्तचर अधिकाऱ्यांना समजले तेव्हा त्यांनी डीआरडीओला सतर्क केले आणि एटीएसला अहवाल देण्यापूर्वी त्यांच्या दक्षता पथकाने त्यांची चौकशी केली.

एकटेपणा दूर करायचा होता: तपासात कुरुलकर यांनी तपास यंत्रणेला सांगितले की, फोनवरील महिला ही पाकिस्तानची आहे, मला माहिती नव्हते. वयाच्या ५९ व्या वर्षी एकटेपणा जाणवत असल्याने त्यांनी महिलेशी बोलणे सुरू ठेवले. फोनवरील महिला ही त्यांच्या कामात रस दाखवत होती. ते कुरुलकर यांची चाहती होती. दरम्यान ती लंडनमध्ये राहत असल्याचे तिने कुरुलकर यांना सांगितले होते. ती सतर्क असावी यासाठी ते तिला माहिती देत. विशेष म्हणजे, डॉ. प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत.

माहिती दिल्यानंतर पाठवायची नग्न फोटो : डॉ. कुरुलकर एकटे असल्याचा फायदा घेत महिला त्यांच्याशी मध्यरात्रीपर्यंत गप्पा करायची. महिलेचे बोलणे कुरुलकर यांना आवडत होते, ते त्या महिलेकडे आकर्षित होत होते. कुरुलकर यांना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे होते. दोघांमध्ये शेकडो व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स झाले आहेत. परंतु कुरुलकरला कधीही धमकावले गेले नाही. कारण महिलेने मागितलेली माहिती कुरुलकर प्रश्न करता देत होते. माहिती दिल्यानंतर ती महिला तिचे नग्न फोटो पाठवत होती. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित त्याने तिला दुसऱ्या देशात भेटण्याची योजना आखली असती.

या गोष्टींचा होतोय तपास : डॉ. कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले की त्यांना आर्थिक लाभ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी भेटले का याचा तपास केला जात आहे. शासकीय पासपोर्ट वापरत कुरुलकर यांनी मागील वर्षी नेपाळ आणि मलेशियासह ५ ते ६ देशांना भेट दिली होती. तेथे कोणाला भेटले याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान या तपासातून काही नावे हाती आली आहेत, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

९ गॅजेट्स जप्त करण्यात आले : एटीएसने डॉ. कुरुलकर यांच्याकडून ९ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केली आहेत. यात तीन मोबाईल, एक लॅपटॉप, डेस्कटॉप, पेन ड्राईव्ह ह्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. कुरुलकर यांनी आपल्या मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. एटीएसने तो डेटा परत मिळवला आहे. ज्याचा तपास करणे आवश्यक होते.

ईमेलचा वापर : डॉ. कुरुलकर यांना भेटण्यासाठी इमेलचा देखील वापर करण्यात आला आहे. दरम्यान, ईमेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून मिळाली आहे. परंतु नेमके काय संभाषण झाले हे समोर आलेले नाही. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही फोटो शेअर केले आहेत. महिलेच्या अश्लील फोटोंच्या मोबदल्यात डॉ. कुरुलकर यांनी अग्नी मिसाईल, ब्रह्मोस मिसाईलची माहिती पाकिस्तानला दिली आहे.

देशविघात कृत्य : न्यायालयाला डॉ. कुरुलकर यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी परकीय देशाला मिसाईलचे फोटो आणि काही संवेदनशील डेटा शेअर केला आहे. जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे. डॉ. कुरुळकर हे ज्या पदावर आहेत त्याचा विचार केला असता, त्यांनी केलेले कृत्य हे देशविरोधी कृत्य आहे. त्यांचे वर्तन हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे, असे न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ करताना म्हटले आहे. एटीएस अधिकाऱ्याच्या मते, डॉ. कुरुलकर यांना अटक करण्यापूर्वी त्यांना संचालक पदावरुन हटवण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते.

  1. Honey Trap : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरील हॅलो, हायचे मेसेज ठरतील घातक; हनी ट्रॅपपासून कसे वाचाल?
  2. DRDO Director: डीआरडीओ संचालकांची रॉकडून होणार चौैकशी; हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय
  3. Honey Trap Victim : हनी ट्रॅपमध्ये का अडकतो तरुण? सोशल मीडिया वापरताना काय घ्यावी काळजी, वाचा स्पेशल रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.