नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वाद सुरूच आहे. आता या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतका तिरस्कार का करतो? तमिळनाडूतील एका पवित्र शैव मठाने पंडित नेहरूंना भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून एक पवित्र 'सेंगोल' दिले होते पण त्यांनी ते 'काठी' म्हणून संग्रहालयात पाठवले. काँग्रेस इतिहास बोगस करण्याचे काम करत आहे. काँग्रेसने आपल्या वर्तनाचा विचार करण्याची गरज आहे'.
-
"Why does the Congress party hate Indian traditions and culture so much? A sacred 'Sengol' was given to Pandit Nehru by a holy Saivite Mutt from Tamil Nadu to symbolize India’s freedom but it was banished to a museum as a ‘walking stick’...Congress is calling Adheenam’s history… pic.twitter.com/6RF87fb02E
— ANI (@ANI) May 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"Why does the Congress party hate Indian traditions and culture so much? A sacred 'Sengol' was given to Pandit Nehru by a holy Saivite Mutt from Tamil Nadu to symbolize India’s freedom but it was banished to a museum as a ‘walking stick’...Congress is calling Adheenam’s history… pic.twitter.com/6RF87fb02E
— ANI (@ANI) May 26, 2023"Why does the Congress party hate Indian traditions and culture so much? A sacred 'Sengol' was given to Pandit Nehru by a holy Saivite Mutt from Tamil Nadu to symbolize India’s freedom but it was banished to a museum as a ‘walking stick’...Congress is calling Adheenam’s history… pic.twitter.com/6RF87fb02E
— ANI (@ANI) May 26, 2023
28 मे रोजी उद्घाटन : नवीन संसद भवनाचे काम सुमारे अडीच वर्षांत पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची पायाभरणी केली होती. आता मोदी 28 मे रोजी त्याचे उद्घाटन करणार आहेत. मात्र त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी काँग्रेससह 21 पक्षांची मागणी आहे. तर दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की जेव्हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधी संसद भवनाच्या इमारतींचे उद्घाटन करू शकतात तर पंतप्रधान मोदी का करू शकत नाहीत?
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली : संसद भवन उद्घाटनाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. संसद भवनाच्या उद्घाटनाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच अशी याचिका पुन्हा दाखल केल्यास तुमच्याकडून दंड आकारला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याचिका का दाखल करण्यात आली हे आम्हाला माहीत आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदीच करणार उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. त्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणखी एक जुनी परंपरा पुनरुज्जीवित होणार आहे. याला 'सेंगोल परंपरा' असे म्हणतात. चोल काळापासून ही परंपरा चालत आली आहे. तथापि, ही परंपरा मौर्य काळातही अस्तित्वात होती असे काही इतिहासकारांचे मत आहे.
सेंगोल म्हणजे काय? : सेंगोल म्हणजे संपत्तीने संपन्न. हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्याच्या वर नंदीची मूर्ती आहे. तो संसदेत स्पीकरच्या अगदी शेजारी ठेवला जाईल. ब्रिटिशांनी हे सेंगोल 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे त्याला स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून देखील म्हणात येऊ शकते.
हेही वाचा :
- Sengol : नव्या संसदेत बसवण्यात येणारा 'सेंगोल' म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या
- New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवन उद्घाटन प्रकरणी याचिकाकर्त्याला दणका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
- New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार