भागलपूर - भागलपूरमध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याविरोधात आंदोलने सुरू झाली. विश्व हिंदू परिषद, अभाविप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भागलपूरमधील सिनेमागृहाच्या आवारात लावलेले पोस्टर फाडून शाहरुख खानच्या पठाणचा निषेध नोंदवला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोस्टरलाही आग लावल्याने तणाव निर्णाण झाला. पठाण चित्रपटाचे पोस्टर हॉलबाहेर लावल्यानंतर काही तासांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. यानंतर त्यांनी पोस्टर फाडून आंदोलन करण्यास सुरुवात केली.
पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन गोंधळ : शाहरुख खानचा चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहे. विविध संघटनांकडून पठाणच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला जात आहे. भागलपूरमधील अनेक संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवावण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी सिनेमागृहाबाहेर जमलेल्या जमावाने एकमेकांच्या खांद्यावर चढून पोस्टर फाडले आहेत. त्यामुळे भागलपूरमध्ये तणाव निर्माण झाला.
विशिष्ट धर्माला टार्गेट करणारा चित्रपट दाखवला जातो : शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध करणाऱ्या आंदोलकाने द काश्मीर फाईल सारखा सत्य दाखवणारा चित्रपट दाखवला जात नाही, हे भारताचे दुर्दैव असल्याचे यावेळी सांगितले. दुसरीकडे ज्या चित्रपटात विशिष्ट धर्माला टार्गेट करून निर्लज्जपणे भगवा दाखवला जातो, असे चित्रपट दाखवले जात असल्याचा आरोपही या आंदोलकाने केला. भगवा हा तपस्येचा आणि तपोभूमीचा महिमा आहे. तो तिरंग्याच्या कपाळावर लावला जातो,. भागलपूरसारख्या शहरात हा चित्रपट चालवणे केवळ अशक्य असल्याचेही या आंदोलकांनी यावेळी सांगितले.
चित्रपटाचे पोस्टर फाडून निघून गेले आंदोलक : शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाचे पोस्टर्स येथे लावण्यात आले होते. मात्र काही तरुणांचा जमाव येथे दाखल झाला. त्यांनी चित्रपट चालू नये, म्हणून आंदोलन केले. भगव्या रंगावरुन या आंदोलकांनी येथे येत आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचे पोस्टर्स फाडून ते निघून गेल्याची माहिती चित्रपटाच्या मालकाने दिली. याबाबत पोलिसांना कळवले असून पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
100 देशांमध्ये पठाण रिलीज : शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. याला काही नागरिक विरोध करत असले तरी अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. आता तरण आदर्श यांनी ट्विटमधून हा चित्रपट परदेशात 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे ट्विट केले आहे. हा भारतीय चित्रपट उद्योगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम असल्याचेही त्यांनी यामध्ये नमूद केले.
हेही वाचा - Honor Of ST Driver : 25 वर्षे विना अपघात सेवा केलेल्या एसटी चालकांना मिळणार 25 हजाराचा धनादेश