नवी दिल्ली - हिमांशी गांधी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये हिमांशीने आत्महत्येसाठी तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीला जबाबदार धरले आहे. या प्रकरणात हिमांशीचा व्हॉटसअप चॅटही समोर आले असून, त्यामध्ये ती कुणाशी बोलत आहे. त्यात तिने असे लिहले आहे की, लोक तिला शेवटचं पाहत आहेत. यानंतर ती आपले आयुष्य संपवणार आहे.
आयुष नावाच्या युवकाला दोषी
या सर्व गोष्टींसाठी तिने आयुष नावाच्या युवकाला आणि इतर काही लोकांना दोषी ठरवले आहे. या गप्पांच्या सुरूवातीला असे लिहिले आहे की ती काही काळापासून ती आजारी होती. अस्वस्थ आहे, तरीही तिचे ओळखीचे लोक तिच्याशी चांगले वागत नाहीत. पुढच्या ओळीत तिने लिहिले की, तिला हे सर्व आता बघवले जात नाही. आता लोक तिला शेवटचं पाहत आहेत त्यानंतर ती तिचे आयुष्य संपवणार आहे. यासाठी तिने आयुषला दोष दिला आहे.
आयुषची चौकशी
ही चॅट जेव्हा झाली तेव्हा हिमांशी सिग्नेचर ब्रिजवर होती. त्यानंतर तिने त्या ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या केली होती. साधारण तिने दुपारी २.२६ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंतची ही चॅट आहे. यानंतर तिने सिग्नेचर ब्रिजवरुन उडी मारून आत्महत्या केली. ही चॅट समोर आल्यानंतर पोलीस सतत आयुषची चौकशी करत आहेत. तसेच आयुषीने एवढं मोठं पाऊल का उचललं याचा तपास करत आहेत. मात्र, अजून पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाही.