सोलन (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्याची अंजली केडी रयोत (वय. 25) मुलीचा मेक्सिकोतील टोळी युद्धादरम्यान गोळ्या लागल्याने मृत्यू झाला आहे. अंजली ही अमेरिकेतील लिंक्डइन कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होती. अंजली सोलन शरहाच्या हाउसिंग बोर्ड कॉलनीतील रहिवासी होती. दरम्यान, ही बातमी समजल्यानंतर अंजलीच्या कुटुंबासह परीसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना अंजलीचे वडील केडी रोयत यांनी आपल्या मुलीचा मृतदेह आपल्या घरी आणण्यासाठी सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.
तट रिसॉर्ट टुलममध्ये रात्रीचे जेवण करत होती
अंजली लग्न झाल्यानंतर अमेरिकेत राहायला गेली होती. गेल्या शुक्रवारी अंजलीचा वाढदिवस होता. त्यामुळे ती तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिकोला गेली होती. तीथे ती तट रिसॉर्ट टुलममध्ये रात्रीचे जेवण करत होती. त्याचवेळी काही टोळ्यांध्ये युद्ध झाले त्यामध्ये दुर्दैवाने अंजलीचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला.
आपल्यावर दु: खाचा डोंगर कोसळला
अंजलीचे पती पती नेटफ्लिक्स कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच आपल्यावर दु: खाचा डोंगर कोसळला. मात्र, आता आपली अपेक्षा आहे की, सरकारने आपल्याला मदत करुन आपल्या मुलीचा मृतदेह आपल्या गावी आणण्यासाठ मदत करावी अशी अपेक्षा अंजलीचे वडील केडी रयोत यांनी व्यक्त केली आहे.
या कामांमुळे कायम आनंदी असायची
अंजली फक्त इंजिनिअर नव्हती. ती ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून खूप प्रसिद्ध होती. देश-विदेशातील प्रेक्षणीय स्थळांच्या सौंदर्याचे चित्रण ती करत असे, आपले इंजिनिअरींग सोडता ती या कामांमुळे कायम आनंदी असायची. तीला आपल्या या इतर आवडीच्या कामात मोठा आनंद मिळत असे. मात्र, दुर्देवाने तिची ही शेवटची सहल ठरली अशी खंत अंजलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : मकबूल शेरवानी... भारतीय सैनिकांना मदत करणारा योद्धा..!