शिमला : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने दहा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. सात मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून, १७ मे पर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. यादररम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
निगेटिव्ह असाल तरच राज्यात प्रवेश..
या संचारबंदी दरम्यान बाहेरून येणाऱ्यांनाही निर्बंध लागू असतील. कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय बाहेरुन येणाऱ्यांना राज्यात प्रवेश मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
दहावीच्या परीक्षा रद्द..
हिमाचल सरकारनेही कोरोना परिस्थिती लक्षात घेता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. वर्षभरातील मार्कांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवले जाणार आहे.
हिमाचलमधील कोरोना परिस्थिती..
राज्यात बुधवारी ३,८४२ नव्या कोरोना रुग्णांची, तसेच ३२ मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यात २५ हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हिमाचल प्रदेशमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. छोटे पवर्त असलेल्या भागांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळत आहे. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १० वर्षांहून कमी वयाच्या सुमारे २ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनामधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. आजतागायत ८३,६७९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. असे असले तरी कोरोनाची दुसरी लाट ही वेगाने पसरत आहेत. त्यामुळे टेस्टिंग आणि लसीकरण वेगाने करण्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : इंदूरमध्ये कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे श्वानाला अटक!