ETV Bharat / bharat

Himachal CM Took Charge : हिमाचलच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला - मुकेश अग्निहोत्री

यावेळी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह (Himachal CM Sukhvinder Singh sukhu) म्हणाले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल. यासोबतच राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लवकरच पारदर्शकता कायदा आणला जाणार आहे. (Transparency Act in Hiamchal).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 12, 2022, 4:05 PM IST

हिमाचलच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला

शिमला : सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. (Himachal CM Sukhvinder Singh sukhu took charge). तत्पूर्वी ते सचिवालयात पोहोचताच पोलिसांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्रीही पोहोचले. मुकेश अग्निहोत्री यांनीही आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. (Himachal Deputy CM Mukesh Agnihotri took charge)

हिमाचलमध्ये पारदर्शकता कायदा आणला जाईल : यावेळी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह म्हणाले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल. यासोबतच राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लवकरच पारदर्शकता कायदा आणला जाणार आहे. मला जनतेची सेवा करण्याची एवढी मोठी संधी मिळेल असे वाटले नव्हते. तसेच हायकमांडच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ज्येष्ठ नेते कौलसिंग ठाकूर, कुलदीपसिंग राठौर, विद्या स्टोक्स यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

मंत्रिमंडळात असतील तरुण चेहरे : पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह म्हणाले की, तरुणांचा सर्व विभागांसह मंत्रिमंडळात देखील समावेश केला जाईल. संघटनेच्या समन्वयावर ते म्हणाले की, संघटनेचा समन्वय चांगला आहे. काँग्रेसचे नवे सरकार मागील भाजप सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांचाही आढावा घेणार आहे. निवडणुका जवळ आल्यावर मागील सरकारने अनेक निर्णय घेतले होते. यासोबतच जुन्या पेन्शनबाबतही ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. (Sukhvinder Singh sukhu meeting with officials) (Himachal CM Sukhvinder Singh Sukhu took charge)

राज्यात काँग्रेसचे सरकार चालेल : हिमाचलच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुकेश अग्निहोत्री म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे सरकार चालेल. हे एक स्थिर आणि कायमस्वरूपी सरकार असेल. यासोबतच हे असे सरकार असेल ज्याचा पाडाव कोणीच करू शकणार नाही. (Himachal Deputy CM Mukesh Agnihotri took charge).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.