ETV Bharat / bharat

Hijab issue : हिजाब घालणाऱ्या 24 विद्यार्थीनी एक आठवड्यासाठी महाविद्यालयातून निलंबित - उप्पिनगडी शासकीय महाविद्यालय

गेल्या काही दिवसांपासून हिजाबचा मुद्दा चर्चेत असलेल्या उप्पिनगडी शासकीय महाविद्यालयात सोमवारी (दि. 6 जून) हिजाब घालण्याचा आग्रह धरणाऱ्या 24 विद्यार्थीनींना एका आठवड्यासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यता आले आहे.

महाविद्यालय
महाविद्यालय
author img

By

Published : Jun 7, 2022, 3:04 PM IST

बंगळुरु (कर्नाटक) - गेल्या काही दिवसांपासून हिजाबचा मुद्दा चर्चेत असलेल्या उप्पिनगडी शासकीय महाविद्यालयात सोमवारी (दि. 6 जून) हिजाब घालण्याचा आग्रह धरणाऱ्या 24 विद्यार्थीनींना एका आठवड्यासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यता आले आहे.

या घटनेनंतर मंगळुरु विद्यापीठाच्या सहसंचालकांनी सोमवारी (दि. 6 जून) महाविद्यालयाला भेट दिली. विद्यार्थीनींची समजूत काढली. त्यानंतरही विद्यार्थीनींनी हिजाब परिधान करून महविद्यालयात प्रवेश करण्याचा हट्ट धरला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य शेखर यांनी सायंकाळी सर्व शिक्षकांची बैठक बोलावली. उच्च न्यायालयाचा निर्णय, शासनाचे परिपत्रक व महाविद्यालयाच्या समितीच्या निर्णयाची आठवण करून दिली. त्यानंतर 24 विद्यार्थीनींना एक आठवड्यासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. यापूर्वीही याच मुद्द्यावरुन सात विद्यार्थीनींना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा - Pak Drone At Jammu : दहशतवाद्यांचा कट उधळला.. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठवलेले तीन आयईडी जप्त..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.