पलामू - काही नागरिकांनी झारखंडच्या जंगलाला खूप विद्रूप केले आहे. मात्र हे जंगल खूप सुंदर असल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. झारखंडमधील नक्षल्यांचा गड मानल्या जाणाऱ्या बुढा पहाडला त्यांनी भेट दिली, त्यावेळी मुख्यमंत्री सोरेन बोलत होते. नक्षलवाद्यांच्या गड मानल्या जाणाऱ्या बुढा पहाडवर भेट देणारे हेमंत सोरेन हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. आतापर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी बुढा पहाडाला भेट दिली नव्हती. आतापासून बुढा पहाडाच्या विकासाची सुरुवात झाल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
-
बूढ़ा पहाड़ स्थित अस्थायी हेलीपैड पर जिला प्रशासन द्वारा माननीय मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन को गार्ड ऑफ ऑनर दिया गया।@JharkhandCMO @HemantSorenJMM @prdjharkhand pic.twitter.com/y5L3SSDlkg
— DC_Garhwa (@dc_garhwa) January 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बूढ़ा पहाड़ स्थित अस्थायी हेलीपैड पर जिला प्रशासन द्वारा माननीय मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन को गार्ड ऑफ ऑनर दिया गया।@JharkhandCMO @HemantSorenJMM @prdjharkhand pic.twitter.com/y5L3SSDlkg
— DC_Garhwa (@dc_garhwa) January 27, 2023बूढ़ा पहाड़ स्थित अस्थायी हेलीपैड पर जिला प्रशासन द्वारा माननीय मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन को गार्ड ऑफ ऑनर दिया गया।@JharkhandCMO @HemantSorenJMM @prdjharkhand pic.twitter.com/y5L3SSDlkg
— DC_Garhwa (@dc_garhwa) January 27, 2023
शस्त्रे आणि रक्तपाताने प्रश्न सुटू शकत नाही : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुढा पहाड येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. येत्या सहा महिन्यात बुढा पहाडचे चित्र बदलणार आहे. दहशत निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना त्यांनी यावेळी शस्त्रे आणि रक्तपाताने प्रश्न सुटू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे नक्षल चळवळीतील लोकांनी मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकार वेगाने विकासकामे करत आहे. झारखंड हे पर्यटनाचे मोठे केंद्र बनू शकत असल्याचे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येथे खाणी कमी असल्या तर गोळ्याही कमी चालतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
-
बूढ़ा पहाड़ भी अब मुख्यधारा से जुड़ेगा।विकास की किरणों से अब तक अछूता रहा यह क्षेत्र प्रगति के पथ पर अग्रसर होगा।माननीय मुख्यमंत्री का दौरा(किसी मुख्यमंत्री का पहला)इसमें मील का पत्थर होगा।
— Mithilesh Kumar Thakur (@MithileshJMM) January 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बूढ़ा पहाड़ की हसीन वादियों में @HemantSorenJMM जी का स्वागत है,अभिनंदन है। pic.twitter.com/N82DmPeg63
">बूढ़ा पहाड़ भी अब मुख्यधारा से जुड़ेगा।विकास की किरणों से अब तक अछूता रहा यह क्षेत्र प्रगति के पथ पर अग्रसर होगा।माननीय मुख्यमंत्री का दौरा(किसी मुख्यमंत्री का पहला)इसमें मील का पत्थर होगा।
— Mithilesh Kumar Thakur (@MithileshJMM) January 27, 2023
बूढ़ा पहाड़ की हसीन वादियों में @HemantSorenJMM जी का स्वागत है,अभिनंदन है। pic.twitter.com/N82DmPeg63बूढ़ा पहाड़ भी अब मुख्यधारा से जुड़ेगा।विकास की किरणों से अब तक अछूता रहा यह क्षेत्र प्रगति के पथ पर अग्रसर होगा।माननीय मुख्यमंत्री का दौरा(किसी मुख्यमंत्री का पहला)इसमें मील का पत्थर होगा।
— Mithilesh Kumar Thakur (@MithileshJMM) January 27, 2023
बूढ़ा पहाड़ की हसीन वादियों में @HemantSorenJMM जी का स्वागत है,अभिनंदन है। pic.twitter.com/N82DmPeg63
आदिवासी वीरांचा अपमान होईल असे काम करु नये : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. आदिवासी वीरांचा अपमान होईल, असे कोणतेही काम करू नका असेही ते म्हणाले. राज्यातील सर्व गावांमध्ये औषधांची दुकाने उघडली जातील. यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली. औषध दुकानाबाबतचा कायदा किचकट होता, आता तो दूर केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. औषधी दुकानाला तांत्रिकदृष्ट्या मोठ्या डॉक्टरांशी जोडून औषध मिळू शकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जंगल म्हणजे शांतीचे माहेरघर : मुख्यमंत्री हेमेंत सोरेन यांनी बुढा पहाड येथे भेट दिल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जंगल म्हणजे शांतीचे माहेरघर आहे. आमचेही असेच गाव आहे. आम्हीही अशाच गावात वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री सोरेन यावेळी सांगितले. डोंगरात राहणाऱ्या आदिवासींच्या हक्कासाठी आपला लढा आहे. पूर्वजांच्या संघर्षामुळे आपण सुरक्षित आहोत. हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहे, हे पूर्वजांच्या संघर्षाचे फळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दिशोम गुरू शिबू सोरेन संघर्षाच्या लढाईसाठी जंगलाच्या डोंगरावर राहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बुढा पहाड विकासासाठी ओळखला जाणार : झारखंड हे वेगळे राज्य झाल्यानंतर जो आनंद झाला, तोच आनंद बुढा पहाड नक्षलवादातून मुक्त झाल्यानंतर होत आहे. बुढा पहाड आता नक्षलवादासाठी नाही, तर विकासासाठी ओळखला जाईल, असे मत मंत्री मिथिलेश ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्य सचिव सुखदेव सिंह, गृह सचिव राजीव अरुण एक्का, डीजीपी नीरज सिन्हा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विनय चौबे, एडीजे संजय आनंद लाटकर, सीआरपीएफचे आयजी अमित कुमार, पलामूचे आयजी राजकुमार लक्डा यांची उपस्थिती होती.
बुढा पहाड होणार शहीद स्मारक : राज्याचे पोलीस महासंचालक नीरज सिन्हा यांनी बुढा पहाडावर शहीद जवानांचे स्मारक बनवले जाणार असल्याची माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री हेमेंत सोरेन यांना दिल्याचेही ते म्हणाले. बुढा पहाडवर आतापर्यंत 58 जवान शहीद झाले आहेत. तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 42 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मागच्या तीन वर्षात 1399 नक्षलवादी अटक करण्यात आले आहेत. यात 31 नक्षलवादी मारल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली. ऑक्टोपस आणि डबल बुल या दोन ऑपरेशनमुळे नक्षलवाद्यांचे कमरडे मोडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बुढा पहाडावर आता 44 सुरक्षा कॅम्प स्थापन करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री हेमेंत सोरेन यांच्या कार्यक्रमासाठी नागरिक दोन तास बुढा पहाड चढून वर आल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
हेही वाचा - New Governor Of Maharashtra : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?