नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज ईशान्य भारत आणि सिक्कीम आणि बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून या राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागांवर मान्सूनचा प्रभाव : पुढील चार दिवसात दक्षिण उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागांवर मान्सूनचा जोरदार प्रभाव दिसून येणार आहे. त्यासह काश्मीर आणि लडाखमध्ये मान्सून सक्रिय राहणार आहे. त्यामुळे येथे मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर मान्सून अधिक सक्रिय आहे. त्यामुळे या भागात अतिवृष्टी होऊ शकते. 16 जुलैच्या आसपास वायव्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
#WATCH | Punjab | District administration carries out rescue operations with the help of the Army and BSF in more than 30 villages hit by floods in the Ferozepur district (12.07) pic.twitter.com/MrsjkFHBer
— ANI (@ANI) July 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Punjab | District administration carries out rescue operations with the help of the Army and BSF in more than 30 villages hit by floods in the Ferozepur district (12.07) pic.twitter.com/MrsjkFHBer
— ANI (@ANI) July 13, 2023#WATCH | Punjab | District administration carries out rescue operations with the help of the Army and BSF in more than 30 villages hit by floods in the Ferozepur district (12.07) pic.twitter.com/MrsjkFHBer
— ANI (@ANI) July 13, 2023
- उत्तर पश्चिम भारत : आज वायव्य भारतातील उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून या भागात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 13 जुलै ते 16 जुलैपर्यंत पूर्व राजस्थान आणि 15 आणि 16 जुलैला हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
Chandigarh | Water supply, sewerage and roads have been damaged due to rain. Our first priority is to fix the water supply pipeline. In the next 3-4 days, all the minor work related to the roads will be done. It may take up to 1 month to fix the road which is completely broken:… pic.twitter.com/SJNw0m1leL
— ANI (@ANI) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chandigarh | Water supply, sewerage and roads have been damaged due to rain. Our first priority is to fix the water supply pipeline. In the next 3-4 days, all the minor work related to the roads will be done. It may take up to 1 month to fix the road which is completely broken:… pic.twitter.com/SJNw0m1leL
— ANI (@ANI) July 12, 2023Chandigarh | Water supply, sewerage and roads have been damaged due to rain. Our first priority is to fix the water supply pipeline. In the next 3-4 days, all the minor work related to the roads will be done. It may take up to 1 month to fix the road which is completely broken:… pic.twitter.com/SJNw0m1leL
— ANI (@ANI) July 12, 2023
पूर्व आणि ईशान्य भारत : पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, झारखंड आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडच्या विविध भागात 14 आणि 15 जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
Volunteers with @HumanityFirstIN serving in #flood affected areas of Punjab in #India pic.twitter.com/jnuZ8nUy5s
— Humanity First International (@HFI1995) July 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Volunteers with @HumanityFirstIN serving in #flood affected areas of Punjab in #India pic.twitter.com/jnuZ8nUy5s
— Humanity First International (@HFI1995) July 13, 2023Volunteers with @HumanityFirstIN serving in #flood affected areas of Punjab in #India pic.twitter.com/jnuZ8nUy5s
— Humanity First International (@HFI1995) July 13, 2023
- विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता : पुढील चार दिवसात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पश्चिम मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
-
⚠️#AgrometAdvisories ⚠
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rainfall likely over various parts of the country.
Follow advisories to save your crops.
#CropManagement #RainfallWarning #Monsoon #Monsoon2023 @moesgoi@DDNewslive@airnewsalerts@ndmaindia pic.twitter.com/3QEpSz0zyX
">⚠️#AgrometAdvisories ⚠
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023
Rainfall likely over various parts of the country.
Follow advisories to save your crops.
#CropManagement #RainfallWarning #Monsoon #Monsoon2023 @moesgoi@DDNewslive@airnewsalerts@ndmaindia pic.twitter.com/3QEpSz0zyX⚠️#AgrometAdvisories ⚠
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023
Rainfall likely over various parts of the country.
Follow advisories to save your crops.
#CropManagement #RainfallWarning #Monsoon #Monsoon2023 @moesgoi@DDNewslive@airnewsalerts@ndmaindia pic.twitter.com/3QEpSz0zyX
- पश्चिम भारत : कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवसात सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि गुजरात प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
-
Current district & station Nowcast warnings at 1430 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
https://t.co/o69UesXdXb
https://t.co/Tx4GDKCKv4
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJYA2y pic.twitter.com/yZ2l9t4zzy
">Current district & station Nowcast warnings at 1430 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023
https://t.co/o69UesXdXb
https://t.co/Tx4GDKCKv4
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJYA2y pic.twitter.com/yZ2l9t4zzyCurrent district & station Nowcast warnings at 1430 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023
https://t.co/o69UesXdXb
https://t.co/Tx4GDKCKv4
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJYA2y pic.twitter.com/yZ2l9t4zzy
- दक्षिण भारत : भारतीय हवामान विभागाने 13 आणि 14 जुलैला वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय कर्नाटकच्या किनारी परिसरात, दक्षिण कर्नाटक आणि केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रॉयलसीमा येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
Significant rainfall recorded across various regions.#RainfallUpdate #WeatherReport #Assam #Meghalaya #UttarPradesh #MadhyaPradesh #Bihar #WestBengal #Sikkim #ArunachalPradesh #Uttarakhand @moesgoi@DDNewslive@airnewsalerts@ndmaindia pic.twitter.com/XuHSeEeHJQ
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Significant rainfall recorded across various regions.#RainfallUpdate #WeatherReport #Assam #Meghalaya #UttarPradesh #MadhyaPradesh #Bihar #WestBengal #Sikkim #ArunachalPradesh #Uttarakhand @moesgoi@DDNewslive@airnewsalerts@ndmaindia pic.twitter.com/XuHSeEeHJQ
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023Significant rainfall recorded across various regions.#RainfallUpdate #WeatherReport #Assam #Meghalaya #UttarPradesh #MadhyaPradesh #Bihar #WestBengal #Sikkim #ArunachalPradesh #Uttarakhand @moesgoi@DDNewslive@airnewsalerts@ndmaindia pic.twitter.com/XuHSeEeHJQ
— India Meteorological Department (@Indiametdept) July 12, 2023
पंजाबमध्ये पुरामुळे नागरिकांचा मृत्यू : पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत पंजाबमध्ये 10 पेक्षा अनेक नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. पंजाबमधील अनेक शहरे जलमय झाली आहेत. नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सतलजच्या पाण्याची पातळी अजूनही वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. जलालाबादमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने काही गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. पंजाबमधील 20 गावातील 250 एकरहून अधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. भारत-पाक सीमेवरील काटेरी ताराही पाण्यात बुडाल्या आहेत.
पाकिस्तानने उघडले प्रकल्पाचे 10 पैकी 6 दरवाजे : पाकिस्तानने त्यांच्या प्रकल्पाचे 10 पैकी 6 दरवाजे उघडले आहेत. पटियालामध्येही 70 पेक्षा अधिक गावांसह शहरातील 15 हून अधिक वसाहतींना पाणी तुंबल्याने पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुरात वाहून गेलेल्या तीन जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. संगरूर खानूरी आणि मुनक परिसरातून जाणाऱ्या घग्गर नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या वर 1.3 फुटांवर पोहोचली आहे.
पंजाबमध्ये बस बेपत्ता झाल्याने खळबळ : पंजाबमध्ये पुराने वेढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाब रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (पीआरटीसी) बस बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. चंदीगड डेपोची बस क्रमांक पीबी 65 बीबी 4893 मनाली रोडवरून निघाली होती. पण ही बस मनालीला पोहोचलीच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बसबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसून बसचा चालक आणि वाहक या दोघांचे फोन नंबरही बंद आहेत.