चंदीगड : तुरुंगात असलेला डेरा सच्चासौदा प्रमुख राम रहीम खरा की खोटा, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली ( Dera Chief Ram Rahim Original Or Fake ) आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली ( Petition On Ram Rahim )आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या राम रहीमचा हावभाव खऱ्या राम रहीमसारखा नाही, असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सोमवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात ( Punjab And Haryana High Court ) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
बनावट असल्याचा आरोप : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या अजब याचिकेत रोहतक तुरुंगात बंद असलेला गुरमीत राम रहीम बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो खरा डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम नाही. खऱ्या राम रहीमचे अपहरण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
सिंहासन मिळवण्यासाठी अपहरण : ही याचिका चंदीगडचे रहिवासी अशोक कुमार आणि डेराच्या जवळपास डझनभर अनुयायांनी हायकोर्टात दाखल केली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत आरोप केला आहे की, डेराचे सिंहासन मिळवण्यासाठी खऱ्या डेरा प्रमुखाचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे किंवा त्याची हत्या केली जाईल. हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत हरियाणा सरकार, हनीप्रीत आणि सिरसा डेरा प्रशासक पीआर नैन यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
चेहऱ्यावर आणि हातात मेकओव्हर : खऱ्या डेरा प्रमुखाचे राजस्थानमधील उदयपूर येथून अपहरण झाल्याचे सूत्रांकडून समजले, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. याचिकेनुसार, पॅरोलच्या कालावधीत कथित डेरा प्रमुख किंवा डमी व्यक्तीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहिल्यानंतर, त्याच्या चेहऱ्यावर आणि हातात मेकओव्हर किंवा मास्क असल्याचे स्पष्टपणे उघड झाले. आता न्यायमूर्ती करमजीत सिंह सोमवारी या याचिकेवर सुनावणी करणार आहेत.
राम रहीम यूपीच्या बागपत आश्रमात राहतो- गेल्या महिन्यातच डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला जेल विभागाने एक महिन्यासाठी पॅरोल दिला आहे. पॅरोलच्या काळात राम रहीम बागपत येथील डेरा आश्रमात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.