ETV Bharat / bharat

Covid 19 Review Meeting : कोविड-19 परिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली बैठक - Covid 19 Review Meeting In India Today

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ( Health Minister Mansukh Mandaviya ) आज कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. अलीकडच्या काळात जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ( Covid 19 Review Meeting In India )

Mansukh Mandaviya
मंत्री मनसुख मांडविया
author img

By

Published : Dec 21, 2022, 7:46 AM IST

नवी दिल्ली : जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये अलीकडच्या काळात कोविड-19 ची प्रकरणे वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ( Health Minister Mansukh Mandaviya ) बुधवारी साथीच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता मंत्री बुधवारी सकाळी 11.30 वाजता कोविड-19 परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. ( Covid 19 Review Meeting In India )

वरिष्ठ अधिकारी होणार सहभागी : आरोग्य विभागाचे सचिव, आयुष, फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक राजीव बहल, NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल आणि लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष एनएल अरोरा आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत.

  • Union Health Minister Dr Mansukh Mandaviya to hold a meeting with senior officials and experts on the COVID-19 situation in the country tomorrow: Sources pic.twitter.com/8CYmNaIHS8

    — ANI (@ANI) December 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी : देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखी घटली आहे. देशात काल 112 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 4 कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर : कोरोनाचे उगम स्थान मानले जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Covid-19) डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.