बंगळुरू (कर्नाटक ) - मंड्या जिल्ह्यात ( mandya high school incident ) आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर महिला मुख्याध्यापिकेने गैरवर्तणुक ( girl student misbehaved in karnataka school ) केली आहे. विद्यार्थिनीने शाळेत मोबाईल आणल्याने संतप्त मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला मारहाण केली. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थिनीचे कपडे उतरविले. विद्यार्थिनीला सायंकाळपर्यंत जमीनवर बसविण्यात आले.
पीडितेच्या माहितीनुसार गैरवर्तणुकीची घटना ( girl student misbehaved in karnataka school ) शुक्रवारी घडली आहे. ही विद्यार्थिनी श्रीरंगपट्टना तालुक्यातील गणनगुरू गावातील सरकारी शाळेत शिकते आहे. त्या दिवशी ती मोबाईल घेऊन शाळेत गेली होती. ही गोष्ट कळताच मुख्याध्यापिका संतप्त झाल्याचे दिसून आले. सर्व विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत मोबाईल जमा करण्याची मुख्याध्यापिकेने सूचना केली. मोबईल जमा केला नाही तर, मुलांकडून तपासणी केली जाईल, असा इशारा आरोपी मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींना दिला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने मुलांना वर्गातून बाहेर काढले. मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मुख्याध्यापिकेने यापूर्वीही विद्यार्थ्यांना केला आहे कठोर दंड
मारहाणीनंतर मुख्याध्यापिकेने कपडे उतरविल्याचा आरोप पीडित विद्यार्थीनीने केला आहे. जमीन थंड लागत असल्याने विद्यार्थिनीने मुख्याध्यापिकेला विनंती करूनही त्यांनी दाद दिली नाही. विद्यार्थिनीला पिण्यासाठी पाणीही दिले नाही. संध्याकाळ झाल्यानंतर विद्यार्थिनीला घरी जाण्याची परवानगी दिली. विद्यार्थिनीने घरी जाऊन आई-वडिलांना घटना सांगितली. त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या घटनेबाबत शिक्षण विभागातील सूत्राने पुष्टी दिली आहे. तहसिलदार श्वेता एन रवींद्र यांनी शाळेचा दौरा करत माहिती जाणून घेतली आहे. आरोपी मुख्याध्यापिकेने यापूर्वीही विद्यार्थ्यांना कठोर दंड दिला आहे. त्यामुळे या मुख्याध्यापिकेला निलंबित ( brutal face of Headmistress ) करण्यात आले होते.
हेही वाचा-Temporary relief to Varvara Rao : ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना 5 फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता दिलासा