ETV Bharat / bharat

Israel Embassy Constable Died : इस्रायली दूतावासात तैनात हेड कॉन्स्टेबलचा संशयास्पद स्थितीत मृत्यू - नवी दिल्लीतील इस्रायली दूतावास

अशोक कुमार हा हवालदार दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेत होता. त्याची ड्युटी वसंत विहारमध्ये राहणार्‍या इस्रायली दूतावासातील अधिकार्‍यांकडे होती. (Israel Embassy Head Constable). दिल्ली पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. (Head Constable posted at Israel Embassy dies).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 4, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासात तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. (Head Constable posted at Israel Embassy dies). अशोक कुमार असे मृताचे नाव आहे. (Israel Embassy Head Constable). पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंत विहार येथील इस्रायल दूतावासाच्या निवासी संकुलात हेड कॉन्स्टेबल संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात हेड कॉन्स्टेबलच्या घरात वाद झाल्याचे समोर आले आहे.

खोलीचा दरवाजा आतून बंद : ही घटना वसंत विहारची आहे, जिथे इस्रायल दूतावासाचे काही अधिकारी राहतात. त्याच कॅम्पसमधील एका खोलीत हवालदार एकटाच राहत होता. 4 डिसेंबर रोजी सकाळी त्याच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र अशोकच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. काच फोडून दिल्ली पोलिसांचे पथक आत पोहोचले.

आत्महत्या असल्याची शक्यता : हा हवालदार दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेत होता. याची ड्युटी वसंत विहारमध्ये राहणार्‍या इस्रायली दूतावासातील अधिकार्‍यांकडे होती. दिल्ली पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या डीसीपींनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसत असून कॉन्स्टेबल अशोक काही कौटुंबिक कारणामुळे नाराज होता, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. हे संपूर्ण प्रकरण दिल्ली पोलीस आणि इस्रायल दूतावासाशी संबंधित असल्याने पोलीस या संपूर्ण घटनेचा अतिशय बारकाईने तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.