ETV Bharat / bharat

HDFC BANK : एचडीएफसी बॅंकेने गृह आणि वाहन कर्जाचे दर वाढविले

भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपणी असलेल्या एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) आपल्या कर्ज दरात वाढ (hikes home and car loan rates) केली आहे. त्यामुळे आता गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना परत एकदा विचार करावा लागणार आहे.

HDFC BANK
एचडीएफसी बॅंकेच्या कर्ज दरात वाढ
author img

By

Published : Jan 11, 2023, 3:43 PM IST

एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) आपल्या गृह कर्जात वाढ केली आहे. भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने कर्जाचा दर वाढवला आहे. एचडीएफसी बँकेने रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये 35 बेसिस पॉइंट्सने वाढ (hikes home and car loan rates) केली आहे. त्यानंतर आता होम लोनचा ईएमआय देखील वाढविला आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणतेही नवीन कर्ज घ्यायचे झाल्यास वाढीव दरानेच मिळेल. एचडीएफसी बँकेने मागल्या वर्षीच ही दरवाढ घोषित केली होती, मात्र आता ती लागू करण्यात आली आहे.

एमसीएलआर दरही वाढविला : एचडीएफसी बॅंकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नवीन व्याजदर 7 जानेवारी 2023 पासुन लागू झालेले आहेत. म्हणजे आता प्रत्येक कर्जावर ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. आरपीएलआर व्यतिरिक्त एचडीएफसी बॅंकेने रात्रऊर कर्जासाठी एमसीएलआर दरही वाढविला आहे. एमसीएलआर आता 8.50 टक्के करण्यात आला. नवीन दरांनुसार आता 1 महिन्यासाठी एमसीएलआर 8.55 टक्के, 3 महिन्यांसाठी 8.60 टक्के, सहा महिन्यांसाठी 8.70 टक्के, एक वर्षासाठी 8.85 टक्के, दोन वर्षासाठी 8.95 टक्के आणि तीन वर्षासाठी 9.05 टक्के व्याजदर आहे.

एमसीएलआर लिंक केलेल्या खात्यांचे तोटे : एचडीएफसी बॅंकेच्या घोषनेनुसार, ज्यांनी एमसीएलआर लिंक्ड प्रोग्राम अंतर्गत कर्ज घतले आहे, त्यांना सर्वांना जास्त नुकसान होणार आहे. त्यांना सर्वात जास्त नुकसान होणार आहे. यामुळे ईएमआयची रक्कम वाढेल. ईएमआयचे दर वाढल्याने आता ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मे पासून आतापर्यंत रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 2.25 टक्कयांनी वाढ केली आहे. सध्या आरबीआयचा रेपो दर 6.25 टक्के आहे, असेही मानले जात आहे की पुढील बैठकीत आरबीआय पुन्हा रेपो दर वाढवू शकते, ज्यामुळे ईएमआय दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्राहकांच्या खिशाला कात्री : आता एचडीएफसी बॅंकेने गृह कर्ज आणि वाहन कर्जात वाढ केल्याने आनेकांच्या खिशाला कात्री लागली आहे. नवीन वर्षात घर बांधण्याचे किंवा घेण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना आता परत एकदा विचार करावा लागेल. तसेच ईएमआय वर वाहन घेणाऱ्या ग्राहकांना देखील विचार करुन कर्ज उचलाव लागणार आहे. आणि भविष्यात देखील या कर्जाचे दर वाढतीवरच आसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.