ETV Bharat / bharat

Ishrat Jahan case: इशरत जहाँचा जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली पोलिस उच्च न्यायालयात, आज सुनावणी

author img

By

Published : Jul 7, 2022, 10:42 AM IST

दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी ( UAPA ) अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी इशरत जहाँला कनिष्ठ कोर्टाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अनु मल्होत्रा ​​यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

दिल्ली पोलिसांची उच्च न्यायालयात धाव
दिल्ली पोलिसांची उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी ( UAPA ) अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी इशरत जहाँला ( Ishrat Jahan case ) कनिष्ठ कोर्टाने जामीन दिला होता. तो रद्द करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अनु मल्होत्रा ​​यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

कनिष्ठ कोर्टाने जामीन मंजूर करून प्रस्थापित कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी जहूर वाटालीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत कनिष्ठ कोर्टाने या निर्णयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे. इशरत जहाँ इतर आरोपींच्या संपर्कात होती. दंगलीचा कट ( Delhi violence ) रचणे हा तिचा उद्देश होता, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

इशरत जहाँला कडकडडूमा न्यायालयाने १४ मार्च रोजी जामीन मंजूर केला होता. इशरत जहाँला 26 फेब्रुवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. इशरत जहाँविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, १४७, १४८, १४९, १८६, ३०७, ३३२, ३५३ आणि ३४ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशरत जहाँने जमावाला भडकावून सांगितले की, आम्हाला मरायचे आहे, पण आम्ही येथून हलणार नाही, पोलिसांनी काहीही केले तरी आम्ही स्वातंत्र्याने जगू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2020 रोजी जगतपुरीमध्ये पोलिसांवर दगडफेकच झाली नाही तर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या.

हेही वाचा - Farooq Abdullah : 'हर घर तिरंगा' मोहिमेवर फारूक अब्दुल्ला चिडले.. म्हणाले, 'तिरंगा तुमच्याच घरात ठेवा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.