ETV Bharat / bharat

Tractor and dumper Accident in Hathras: हाथरसमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरची समोरासमोर धडक; 5 ठार, 16 जण जखमी

हाथरस येथे शुक्रवारी रात्री ट्रॅक्टर आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात 5 जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना आग्रा आणि अलीगढ येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरचा अपघात
ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरचा अपघात
author img

By

Published : Aug 5, 2023, 10:41 AM IST

हाथरस: गोवर्धन परिक्रमा करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सादाबाद रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला असून यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. सर्व भाविक ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये बसून प्रवास करत होते.

असा घडला अपघात:मिळालेल्या माहितीनुसार, एटा जिल्ह्यात असलेल्या जलेसर गावातील काही लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसून गोवर्धन परिक्रमासाठी जात होते. या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 50 ते 60 जण बसलेले होते. हे भाविक एकमेकांचे नातेवाईक आहेत. भाविकांचे ट्रॅक्टर जेव्हा सहपऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सादाबादच्या रस्त्यावर आले तेव्हा समोरून येणाऱ्या डंपरने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16 जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही जखमींना सादाबाद येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर 3 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सादाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी 10 जणांना आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींमधून एका 16 वर्षीय पवन कुमार नावाच्या मुलाला अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. सुलतान सिंग आणि त्यांची पत्नी रामवती यांच्यावर हाथरस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे : माधुरी ( वय 22, सकरौली ), लखमी (वय 18), अभिषेक (वय 22), हेमलता (वय 12,फिरोजाबाद ) आणि विक्रम अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. सहपऊ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमित कुमार यांच्या माहितीनुसार, मृतांची संख्या 5 झाली आहे. जखमींपैकी 13 जणांना सादाबाद येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. अपघात जखमी झालेले सुल्तान सिंह यांनी सांगितले की, ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 50 ते 60 जण बसले होते. आम्ही सर्वजण गोवर्धन परिक्रमा करण्यासाठी जात होतो. आमचे ट्रॅक्टर सहपऊ परिसरात आले, तेव्हा समोरुन येणाऱ्या डंपरने आमच्या ट्रॅक्टरला धडक दिली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळी भेट : अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक देवेश कुमार पांडे, मुख्याधिकारी गोपाल सिंह, सादाबादचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार, तहसीलदार अनिल कुमार, नायब तहसीलदार सत्येंद्र चौधरी आणि इतर अधिकारी सादाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे दाखल करण्यात आलेल्या जखमींना योग्य उपचार मिळावा, याची व्यवस्था दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा-

  1. Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; रसायन घेऊन जाणारा ट्रक जळून खाक
  2. UP Car fire : अंबाला-डेहराडून महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, कारमधील 4 जणांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.