ETV Bharat / bharat

Yati Narsinghanand Arrested : मुस्लिम महिलांवर अशोभनीय वक्तव्य; स्वामी यति नरसिंहानंद अखेर अटकेत - हरिद्वार धर्म संसद

हरिद्वार पोलिसांनी ( Haridwar Police ) स्वामी यति नरसिंहानंद यांना अटक केली ( Yati Narsinghanand Arrested ) आहे. हरिद्वार धर्म संसदेत ( Haridwar Dharma Sansad ) मुस्लिम महिलांवर असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी ( Haridwar Hate Speech Case ) ही अटक करण्यात आली आहे.

स्वामी यति नरसिंहानंद
स्वामी यति नरसिंहानंद
author img

By

Published : Jan 16, 2022, 2:09 AM IST

हरिद्वार : हरिद्वार पोलिसांनी ( Haridwar Police ) मोठी कारवाई करत स्वामी यती नरसिंहानंद यांना अटक केली ( Yati Narsinghanand Arrested ) आहे. हरिद्वार धर्म संसदेत ( Haridwar Dharma Sansad ) मुस्लिम महिलांबद्दल असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी ही अटक झाली ( Haridwar Hate Speech Case ) आहे. कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या रुचिकाने मुस्लिम महिलांबद्दल असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

  • Haridwar | Religious leader Yati Narsinghanand arrested for Haridwar 'Dharm Sansad' hate speeches

    This is the second arrest in the case after Waseem Rizvi pic.twitter.com/2j0wv1Rsxz

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विद्यार्थिनीने दिली होती तक्रार

हरिद्वार धर्म संसदेत यती नरसिंहानंद यांच्यावर मुस्लिम महिलांवर असभ्य टिप्पणी केल्याचा हा गुन्हा हरिद्वार शहर कोतवाली ठाण्यात नोंदवण्यात आला होता. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी रुचिकाने तहरीरमध्ये सांगितले की, 'फेसबुकच्या माध्यमातून तिला समजले की, एका विशिष्ट धर्माच्या महिलांवर अशोभनीय टिप्पणी करण्यात आली आहे. जी पूर्णपणे चुकीची आणि असंवैधानिक आहे'. ज्या प्रकरणात ही अटक झाली आहे.

आंदोलन करत असतानाच घेतले ताब्यात

हरिद्वारमध्ये जितेंद्र नारायण त्यागी उर्फ ​​वसीम रिझवीच्या अटकेचा ( Jitendra Narayan Singh Tyagi ) स्वामी यती नरसिंहानंद निषेध करत होते. ज्यासाठी ते दुसऱ्या एका साधूसोबत उपोषणाला बसले होते. शनिवारी त्यांनी आपले उपोषण संपवून सत्याग्रह सुरू केला. सायंकाळी उशिरा पोलिसांनी स्वामी यति नरसिंहानंद गिरी यांना आंदोलनस्थळावरून उचलले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

व्हिडीओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल

यती नरसिम्हानंद यांच्यावरील हरिद्वार धर्म संसद द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच मुस्लिम महिलांवर असभ्य टिप्पणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायद्याचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी रुचिकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. हरिद्वार धर्म संसदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यासह वसीम रिझवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी १३ जानेवारी रोजी वसीम रिझवी आणि जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना अटक करण्यात आली आहे.

काय झालं होत धर्म संसदेत?

१७ ते १९ डिसेंबर दरम्यान हरिद्वारमध्ये धर्म संसद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये एका विशिष्ट समुदायाविरोधात काही आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. ही विधाने सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर या व्हायरल व्हिडिओंच्या आधारे अनेकांनी २३ डिसेंबर रोजी हरिद्वार शहर कोतवालीमध्ये माजी शिया वक्फ बोर्ड अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणांमध्ये संत धर्मदास, साध्वी अन्नपूर्णा भारती, स्वामी यती नरसिंहानंद आणि सागर सिंधू महाराज यांची नावे वाढवली होती. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.