गांधीनगर - गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल ( Former Congress leader Hardik Patel ) आता २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गांधीनगर येथील भाजपचे प्रदेश कार्यालय कमलम येथे हार्दिक पटेल भाजपमध्ये ( Gandhinagar BJP office ) प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल औपचारिकपणे 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार ( Hardik Patel will join BJP ) आहेत. गांधीनगरमधील कमलम येथे दुपारी १२ वाजता हार्दिक पटेल प्रवेश करणार ( Hardik Patel resigned Congress posts ) आहेत. या दिवशी केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसवर केली होती टीका-यापूर्वी 18 मे रोजी हार्दिक पटेलने काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितले होते. असले तरी आज अखेरीस हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुजरातमधील निवडणुकीला सामोरे जाणे काँग्रेसला होणार कठीण- काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वीच हार्दिक पटेलने अनेकवेळा भाजपमध्ये येण्याचे संकेत दिले होते. त्याने व्हॉट्सअॅपवर केशरी रंगाचे उपरणे घातलेला फोटो पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी भाजप सरकारचे कौतुक केले. काँग्रेसमध्ये असतानाही ते भाजपच्या काही नेत्यांसह एकाच कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला निवडणूक जिंकणे कठीण होऊ शकते.
हेही वाचा-नेपाळमधील विमान दुर्घटनेत 22 मृतदेह सापडले; रेस्क्यू अधिकाऱ्यांची माहिती
हेही वाचा-Gyanwapi Masjid: ज्ञानवापी सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल
हेही वाचा-Padma Awards 2023: पद्म पुरस्कार-2023 साठी नामांकनाची अंतिम मुदत 15 सप्टेंबर