मुंबई: आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पांड्याला ( Captain Hardik Pandya ) 26 आणि 28 जून रोजी आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. संघातील एकमेव नवा चेहरा म्हणजे महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठी ( Batsman Rahul Tripathi ), ज्याला आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. त्रिपाठीने सनरायझर्स हैदराबादसाठी 400हून अधिक धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत उपकर्णधार पद पांड्याकडे सोपवण्यात आले असून, घरच्या मालिकेनंतर तो इंग्लंडमध्ये कसोटी संघात सामील होणार आहे. राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या अंतिम फेरीत नेणारा संजू सॅमसन ( Batsman Sanju Samson ) संघात परतला आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार असेल. यष्टिरक्षक 36 वर्षीय दिनेश कार्तिक असेल, पण गरज भासल्यास इशान किशन आणि सॅमसन दोघेही यष्टीरक्षण करु शकतात.
-
🚨 NEWS 🚨: India’s squad for T20I series against Ireland announced.#TeamIndia
— BCCI (@BCCI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🚨 NEWS 🚨: India’s squad for T20I series against Ireland announced.#TeamIndia
— BCCI (@BCCI) June 15, 2022🚨 NEWS 🚨: India’s squad for T20I series against Ireland announced.#TeamIndia
— BCCI (@BCCI) June 15, 2022
भारतीय टी-20 संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हरेश पटेल, अविनाश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
हेही वाचा - Kapil Dev Statement : '१ २ मॅचमध्ये धावा करतो परत अपयशी होतो...', 'या' खेळाडूवर संतापले कपिल देव