वाराणसी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणाची ( gyanvapi mosque case ) सुनावणी जिल्हा न्यायालयात ( Varanasi District Court ) पार पडली. वादी आणि प्रतिवादी दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीसाठी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आजची तारीख निश्चित केली आहे.
हिंदू बाजूने सर्व प्रकरणे सोबत घेऊन पुढे जाण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने पूजा कायदा प्रकरणी 7 नियम 11 अंतर्गत प्रथम सुनावणीची मागणी केली आहे. मागील आणि नवीन अशा एकूण 7 याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. आज कोणत्या याचिकांवर प्रथम सुनावणी होणार आणि संपूर्ण खटला कोणत्या स्वरूपात चालणार हे न्यायालय ठरवणार आहे.