ETV Bharat / bharat

Gyanvapi Case : ज्ञानव्यापी गौरी श्रृंगार मालकी हक्क प्रकरण; न्यायालयाने राखून ठेवला निकाल, 28 ऑगस्टला देणार निकाल - ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण

ज्ञानव्यापी गौरी श्रृंगार मालकी हक्क प्रकरणी अलहाबाद उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणावर न्यायालय 28 ऑगस्टला निकाल देणार आहे.

Verdict Reserved In Gyanvapi
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 26, 2023, 10:03 AM IST

प्रयागराज : ज्ञानव्यापी गौरी श्रृंगार प्रकरणी मालकी हक्कावरुन दोन्ही समूदायांकडून दावा करण्यात येत आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी ज्ञानवापी संकुलाच्या मालकीबाबत वाराणसी न्यायालयात प्रलंबित याचिकेवर निकाल राखून ठेवला आहे. 28 ऑगस्टला याबाबतचा फैसला अलाहाबाद न्यायालयात करण्यात येणार आहे.

ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण : वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश एएसआयला दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासून ज्ञानवापी संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यासाठी एएसआयचे अधिकारी दाखल झाले होते. मात्र या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने सर्व्हेक्षण करण्यास 26 जुलैपर्यंत थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देशही दिले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून : अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी ज्ञानवापी संकुलाच्या मालकीबाबत वाराणसी न्यायालयात प्रलंबित प्रकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निर्णय राखून ठेवला. ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करून घेण्याच्या आदेशासाठी दाखल करण्यात आलेल्या दिवाणी दाव्याच्या वैधतेला आव्हान दिले. अलाहाबाद उच्च न्यायालय आता 28 ऑगस्टला आपला निकाल देणार आहे.

पाच याचिकांवर एकत्रित सुनावणी : न्यायमूर्ति प्रकाश पाडिया यांनी मंगळवारी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी वाराणसीच्या पाच याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली. त्यानंतर हा निर्णय राखून ठेवण्याचा आदेश दिला. यापूर्वीही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. वाराणसी न्यायालयाच्या शास्त्रोक्त सर्वेक्षणाच्या आदेशावर निर्णय होईपर्यंत मुदतवाढ दिली होती. यावेळी न्यायालयाने पक्षकारांच्या वकिलांना काही मुद्यांवर स्पष्टीकरण देण्याबाबत पुन्हा सुनावणी घेण्यास सांगितले होते.

पुन्हा वैज्ञानिक सर्वेक्षणाचे आदेश का दिले : मंगळवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काही मुद्द्यांवर प्रश्नांची उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. निकाल सुरक्षित असताना जिल्हा न्यायाधीशांनी पुन्हा वैज्ञानिक सर्वेक्षणाचे आदेश का दिले, असा सवाल न्यायालयाने मंदिर पक्षाचे वकील विजय शंकर रस्तोगी यांना केला. त्यावर उत्तर देताना न्यायालयाने सर्वेक्षण करण्याच्या आदेशाला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली नाही. तक्रारदाराच्या वतीने मे 2023 मध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. याचिकाकर्त्याने तेथे आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी कथित वजूखान्यात सापडलेले शिवलिंग वगळता संपूर्ण परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत बंदी घालताना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

स्पष्टीकरण घेऊन निकालाची तारीख निश्चित : न्यायालयाला वकील एसएफए नक्वी आणि वकील पुनीत गुप्ता यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते. त्यावर याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले. न्यायालयानेही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पडताळून पाहिला. त्यानंतर अन्य काही प्रश्नांचे स्पष्टीकरण घेऊन निकालाची तारीख निश्चित केली. राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता अशोक मेहता आणि केंद्र सरकारच्या वतीने एएसजीआय शशी प्रकाश सिंग हेही न्यायालयात उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी मशीद परिसराचे २६ जुलैपर्यंत सर्वेक्षण थांबवा-सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.