ETV Bharat / bharat

मंत्री होताच ज्योतीरादित्य सिंधियाचे एफबी खाते हॅक, मोदीविरोधी आणि काँग्रेसचे कौतुक करणारे व्हिडिओ पोस्ट - ज्योतिरादित्य सिंधियांचे फेसबुक खाते हॅक

भाजपा नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांचे गुरुवारी फेसबुक खाते हॅक झाल्याची घटना घडली. केंद्रीय मंत्र्यांच्या फेसबुक पेजवर हॅकर्सनी एक जुना व्हिडिओही पोस्ट केला.

ज्योतीरादित्य सिंधिया
ज्योतीरादित्य सिंधिया
author img

By

Published : Jul 9, 2021, 10:23 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या काही तासांनी भाजपा नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांचे फेसबुक खाते हॅक झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या फेसबुक पेजवर हॅकर्सनी एक जुना व्हिडिओही पोस्ट केला. त्यामध्ये सिंधिया काँग्रेस पक्षाचे कौतुक करताना दिसत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. गुरवारी त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

फेसबूक पोस्ट व्हायरल होताच सिंधियाच्या आयटी टीमने ताबडतोब खाते रिकव्हर केले. अद्याप ज्योतीरादित्य सिंधिया यांचे खाते कोणी हॅक केले याची माहिती समोर आलेली नाही. आयटी तज्ञांची टीम शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्वाल्हेर क्राइम ब्रांच पोलीस स्थानकात केंद्रीय मंत्र्यांचा फेसबुक आयडी हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे माहिती आहे. आयडी हॅक करून जुने व्हिडिओ आणि फोटो लावणऱया आरोपीचा शोध सुरू आहे.

ग्वाल्हेर राजघराण्यातील ज्योतीरादित्य सिंधिया यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडण्यात आणि राज्यात भाजपाची सत्ता स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर सिंधिया यांनी ट्विट केले, की 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेतृत्व यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात माझा समावेश केल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मला जी काही जबाबदारी देण्यात आली आहे, ती मी मोदीजींच्या नेतृत्वात आणि पक्षाच्या धोरणांचे पालन करून पूर्ण क्षमतेने पार पाडेल.

हेही वाचा - शिंदे ते सिंधिया, वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडणाऱ्या मराठमोळ्या ज्योतीरादित्य यांची जाणून घ्या राजकीय कारकीर्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.