मुंबई : रेड्डी यांनी या कराराच्या सुमारे एक वर्ष आधी, आम्ही निधी उभारणीकडे लक्ष देत होतो कारण आम्ही आमच्या विमानतळ होल्डिंग कंपनीमध्ये सुमारे 10 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. जेव्हा आम्ही बंगलोर विमानतळावर गेलो. त्याचे कर्ज थकीत होत होते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांशी चर्चा करत होतो आणि आम्ही तीन गुंतवणूकदारांशी करार केला आहे. जरी ते अनेक अटी लादत होते. मग कोरोना आला आणि विमानतळाचा व्यवसाय तीन महिने ठप्प झाला. पैसे आले नाहीत. त्यामुळे पैशांचा अधिक दबाव निर्माण झाला असही ते म्हणाले आहेत.
आमच्यावर कर्जही होते : त्याच वेळी गौतम अदानी मला भेटले आणि म्हणाले. त्यांना मुंबई विमानतळाच्या व्यवसायात इंटरेस्ट आहे. त्यांनी फक्त एक महिन्यात पैसे देऊ असे सांगितले. आमच्यासाठी ते खूप महत्वाचे होते. ते म्हणाले की, सीबीआय किंवा ईडीने आमच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. कंपनीला त्याची गरज असल्याने आम्ही हा करार केला. कारण आम्हाला सावकारांना उत्तर द्यायचे होते. आमच्यावर कर्जही होते. त्यामुळेच आम्ही अदाणी समूहाबरोबर करार केला. राहुल गांधींच्या आरोपाबाबत बोलायचे झाल्यास, त्यावेळी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता असा खुलासा रेड्डी यांनी केला आहे.
तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला : मंगळवारी संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली असे ते म्हणाले. तसेच, मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीवीके कंपनीकडून घेऊन अडाणींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोपही त्यांनी केला होता.
राहुल गांधींनी काय म्हणाले होते? : काल मंगळवार (दि ८ फेब्रुवारी) संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदानी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली असा थेट आरोप केला आहे. तसेच, मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीवीके कंपनीकडून घेऊन अदानींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा : अदानींची संपत्ती आठ वर्षात ८ अब्ज डॉलर्सवरून १४० अब्ज डॉलर्स कशी झाली? राहुल गांधींचा सवाल