ETV Bharat / bharat

Guwahati Bikaner express derailed : गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेस रेल्वेचे डबे घसरले, 5 ठार, संख्या वाढण्याची शक्यता - Mamata Banerjee discussion with Modi

दोमोहानी रेल्वे दुर्घटना आज सायंकाळी पाच वाजता ( Domohani train derailed ) घडली आहे. घटनेत मृत्यू झाल्याचे अद्याप माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी मदतकार्य सुरू ( rescue operation at rail accident ) आहे.

बीकानेर एक्सप्रेस रेल्वेचे डबे घसरले
बीकानेर एक्सप्रेस रेल्वेचे डबे घसरले
author img

By

Published : Jan 13, 2022, 6:05 PM IST

Updated : Jan 13, 2022, 7:12 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील दोमोहानीमध्ये रेल्वेचा अपघात झाला आहे. माध्यमाच्या अहवालानुसार गुवाहाटी-बीकानेर एक्सप्रेस 15633 (अप) ( Guwahati Bikaner Express derailed ) चार ते पाच डब्बे रुळावर ( 5 coaches derailed ) उतरले आहे. ही घटना आज सायंकाळी 5 वाजता घडली आहे. या अपघातात 5 जण दगावल्याची माहिती ( deaths in Jalpaigur rail accident ) मिळाली आहे.

रेल्वे मंत्री वैष्णव हे घटनास्थळी पोहोचणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने मदतीची घोषणा केली आहे. दोमोहानी रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक (Railway Helpline numbers) - 03612731622, 03612731623 जाहीर केला आहे. या दोन हेल्पलाईनवर दुर्घटनेबाबत माहिती मिळू शकणार आहे.

गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेस रेल्वेचे डबे घसरले

हेही वाचा-Sanjay Raut Meets Rakesh Tikait : खासदार संजय राऊत यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेची घेतली माहिती.

जलपाईगुडी रेल्वे दुर्घटनेत ( Jalpaiguri Train derail ) काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका आहे. त्याबाबत अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही. दुर्घटनेत किमान 30 प्रवाशी जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून दुर्घटनेची ( Mamata Banerjee discussion with Modi ) माहिती घेतली आहे.

गुवाहाटी-बीकानेर एक्सप्रेस रेल्वेचे डबे घसरले

हेही वाचा-Mekedatu Padayatra : काँग्रेसला पदयात्रा बंद करण्याचे कर्नाटक राज्य सरकारचे आदेश

रेल्वे मंत्री घटनास्थळी पोहोचणार

रेल्वे मंत्रालयाचे ऑन स्पेशल ड्युटी ऑफिसर (officer on special duty) वेद प्रकाश म्हणाले, की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे घटनास्थळी पोहोचणार आहे. मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना 1 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 25 हजारांची मदत दिली जाणार आहे.

हेही वाचा-After 74 Years Brothers Meet : फाळणीचा नरसंहार! दोन सख्खे भाऊ भेटले 74 वर्षांनी;भेटून आश्रूंचा बांध फुटला

घटनास्थळी पाठविली रेल्वे अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन

जलपाईगुडीमधील रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या विभागाच्या माहितीनुसार रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. रेल्वेने म्हटले आहे, की मंडल रेल प्रबंधक, अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक हे दोमोहानी येथे पोहोचणार आहेत. एक्सिडेंट रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅन पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, धुक्यामुळे रेल्वेचा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Jan 13, 2022, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.