नवी दिल्ली Gurpatwant Singh Pannun Threatens : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानं आता आणखी एक व्हिडिओ जारी करुन धमकी दिलीय. 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी भारतीय संसदेवर हल्ला करणार असल्याचं गुरपतवंत सिंग पन्नू यानं म्हटलंय. यावेळी त्यानं आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला होता. हा प्रयत्न हाणून पाडल्याचंही त्यानं म्हटलं. 22 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता.
व्हिडिओत काय आहे : गुरपतवंतच्या नवीन व्हिडिओमध्ये त्याच्या मागं अफजल गुरुचं पोस्टर दिसतयं. या पोस्टरवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ असं लिहिलंय. या व्हिडिओमध्ये, पन्नूनं दावा केलाय की, भारतीय एजन्सींचा त्याच्या हत्येचा कट फसवण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना पन्नू म्हणाला की, ते 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी भारतीय संसदेवर हल्ला करणार आहोत, अशी धमकी त्यानं दिलीय. पन्नूचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं की, पाकिस्तानी आयएसआयच्या K2 डेस्क (काश्मीर – खलिस्तान) यांनी पन्नूला आपला भारतविरोधी अजेंडा वाढवण्याची सूचना केलीय.
अमेरिकेचं मोठे विधान : पन्नूच्या हत्येचा कट रचण्यात भारतीय अधिकाऱ्याच्या भूमिकेवरील आरोपांबाबत भारताच्या तपासाच्या निष्कर्षांची वाट पाहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या गृह विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मंगळवारी सांगितलं की, “राज्य सचिवांनी हे त्यांच्या परदेशी समकक्षासमोर मांडलंय. आम्ही हे प्रकरण गांभीर्यानं घेत असल्याचही त्यांनी सांगितलंय. तसंच याची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अमेरिकेतील सरकारी वकिलांनी आरोप केलाय की, एका भारतीय नागरिकानं अमेरिकेत खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. भारतीय व्यक्ती एका भारतीय अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचा आरोपही वकिलानं केलाय.
- पन्नूची ही धमकी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आलीय. हे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
हेही वाचा :