ETV Bharat / bharat

'काश्मिरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गुपकर अलायन्स मिळून लढणार'

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत गुपकर अलायन्स ही संघटना सर्व स्थानिक पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पिपल्स कॉन्फरन्स, सीपीआय(एम) या पक्षांनी मिळून गुपकर अलायन्स ही संघटना स्थापन केली आहे.

गुलाम अहमद मीर
गुलाम अहमद मीर
author img

By

Published : Nov 15, 2020, 8:49 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत गुपकर अलायन्स ही संघटना सर्व स्थानिक पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत. जम्मू काश्मीरवर बळजबरीने कायदा लादणाऱ्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न अलायन्सकडून करण्यात येणार असल्याचे जम्मू काश्मीरचे काँग्रेसचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांनी म्हटले.

शांततेत जागा वाटप

जागा वाटपाबाबत आज फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावर आम्ही समाधानकारक आहोत. राजकारणात काहीही १०० टक्के समाधानकारक नसते. मात्र, शांततापूर्ण वातावरणात सर्व चर्चा झाली. गुपकर अलायन्समधील सर्व पक्ष मिळून बरजबरीने कायदे लादणाऱ्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करेल, असे मीर यांनी बैठकीनंतर सांगितले. योग्य उमेदवाराला निवडणूक देणं हा इतर पद्धतीने आंदोलन करण्यापेक्षा योग्य पर्याय आहे, असे मीर म्हणाले.

स्थानिक पक्षांची ऐकी

नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पिपल्स कॉन्फरन्स, सीपीआय(एम) या पक्षांनी मिळून गुपकर अलायन्स ही संघटना स्थापन केली आहे. काश्मीरची स्वायत्तता माघारी मिळविणे हे या संघटनेचे ध्येय आहे. या ध्येयासाठी सर्व स्थानिक पक्ष एकत्र आले असून भाजपाचा विरोध करत आहे. कायदेशीर मार्गाने काश्मीरची लढाई लढणार असल्याचे गुपकर अलायन्सने स्पष्ट केले आहे.

काल (शनिवार) पिपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री मुजफ्फर हुसेन बेग यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये (एनसी) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, या फॉर्म्युल्यावर बेग नाराज होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.