ETV Bharat / bharat

Gujrat Assembly Election 2022: गुजरातमध्ये उमेदवारांच्या पळवापळवीला सुरुवात.. आम आदमीचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवले - आम आदमीचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवले

Gujrat Assembly Election 2022: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर उमेदवारांच्या पळवापळवीची शक्यता लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने त्यांच्या उमेदवारांना सुरतमधून अज्ञातस्थळी हलवले AAP Shifted Candidates To Unknown Location आहे. AAP Candidates From Surat

Gujrat Assembly Election 2022 All candidates from Surat Aam Admi party shifted to unknown location
गुजरातमध्ये उमेदवारांच्या पळवापळवीला सुरुवात.. आम आदमीचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवले
author img

By

Published : Nov 17, 2022, 12:34 PM IST

सुरत (गुजरात): Gujrat Assembly Election 2022: पक्षाने आम आदमी पार्टीच्या सुरतमधील सर्व उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवले AAP Shifted Candidates To Unknown Location आहे. सुरत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊ नयेत, यासाठी पक्षाने सावधगिरी बाळगून हा निर्णय घेतला आहे. सुरतच्या लिंबायत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. या कारणास्तव सर्व उमेदवारांना अज्ञातस्थळी पाठवण्यात आले. AAP Candidates From Surat

दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेतृत्व गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तिथे भारतीय जनता पक्ष कसा मागे पडेल? त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील वापी येथे रोड शो करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) इतर वरिष्ठ नेते गुजरातमध्ये अनेक रोड शो आणि जाहीर सभा घेऊ शकतात. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी पक्षाने आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की मोदी 19 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या वापी येथे रोड शो करण्याची शक्यता आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर वरिष्ठ नेते देखील राज्याच्या विविध भागात जनसंपर्क कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.

पंतप्रधान 19 नोव्हेंबरला त्यांच्या गृहराज्यात पोहोचतील आणि त्यानंतर ते पुढील दोन दिवस राज्यभरात जाहीर सभा घेणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, शाह 1 आणि 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 30 हून अधिक जाहीर सभा घेऊ शकतात. पक्षाची निवडणूक रणनीती आणि प्रचाराला अंतिम रूप देण्यासाठी ते सातत्याने राज्यात तळ ठोकून आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.