ETV Bharat / bharat

ऑनलाईन गेमचे वेड; 17 वर्षीय मुलाने रागाच्या भरात केला वडिलांचा खून - सुरत क्राईम न्यूज

लहान मुलं आणि तरुण ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकत आहेत. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्स यामुळे हा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन गेम्सच्या नादात भांडण, खून आणि आत्महत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. अशीच एक बातमी गुजरातमधून समोर आली आहे. गेम खेळण्यावरून रागावल्याने मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली.

ऑनलाईन गेम
सुरत
author img

By

Published : Sep 3, 2021, 1:16 PM IST

सुरत - तरुणांमध्ये ऑनलाईन गेमचे वेड वाढतच चालले आहे. राज्यासह देशात वेगवेगळ्या गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग गुरफटला आहे. गेमच्या नादापायी गुजरातमध्ये 17 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोबाईलवर सतत गेम खेळल्याबद्दल वडिलांनी मुलाला फटकारले. यावर राग आल्याने त्याने थेट वडिलांचा गळा दाबून खून केला. सुरतमधील हजीरा येथे गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. सुरवातीला त्याने वडिलांचे अपघातात निधन झाल्याचे सांगून कुटुंबाची दिशाभूल केली. मात्र, चौकशीदरम्यान आपणच वडिलांना ठार केल्याचे त्याने कबूल केले.

यापूर्वी गेमच्या नादात अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिवसेंदिवस तरुणाईमध्ये ऑनलाईन गेमची क्रेझ वाढत चालली आहे. मोबाईलवर तासनतास एक टक लावून गेम खेळणाऱ्या तरुणांमध्ये चिडचिडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमच्या आहारी जाणाऱ्या मुलांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

पालकांपुढे नवीन संकट -

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आता काही अंशी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातही ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल फोन देणे पालकांना भाग आहे. मुले अभ्यासाव्यतिरिक्त गेम खेळणे, इंटरनेटवर सर्फिंग करणे, यासारख्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. अभ्यास करण्याचे कारण देऊन ही मुले गेम खेळत असल्यामुळे पालकांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे.

हेही वाचा - सावधान! पालकांनो आपली मुलं काय करत आहेत?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.