ETV Bharat / bharat

Gujarat Paper leak : गुजरात पेपर लीकचे धागेदोरे थेट हैदराबादशी! शहरातील प्रिंटिंग प्रेसमध्ये छापला पेपर

author img

By

Published : Jan 31, 2023, 3:24 PM IST

गुजरातमधील कनिष्ठ लिपिक परीक्षेचे पेपर हैदराबादच्या प्रिंटीग प्रेसमध्ये छापले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आंतरराज्य टोळीतील 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Paper leak
पेपर लीक

हैदराबाद : गुजरातमधील कनिष्ठ लिपिक परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण हैदराबादशी जोडलेली आहे. पेपर लीक प्रकरणी गुजरात एटीएसने आरोपींना वडोदरा कोर्टात हजर करून १२ दिवसांची कोठडी दिली आहे. कोर्टात सादर केलेल्या तपशीलानुसार पेपर लीक घोटाळ्याचे मूळ हैदराबादमध्ये आहे. पेपर फुटीची डील हैदराबाद येथील ज्युबली हिल्स रोडवर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

हैदराबादच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर छापला : याप्रकरणी आंतरराज्य टोळीतील 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या 15 आरोपींना न्यायालयात हजर करून रिमांडही मिळवण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या सर्वांशिवाय आणखी काही आरोपींचा यात सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे. या घोटाळ्यात सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे. मात्र हैदराबाद येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर छापला जाणार असल्याची माहिती आरोपींना कोणी दिली?, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित आणखी किती व्यवहार झाले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

29 जानेवारीला होती परीक्षा : गुजरातमध्ये रविवार 29 जानेवारी रोजी होणारी कनिष्ठ लिपिक परीक्षा 2018 रद्द करण्यात आली होती. परीक्षेच्या पाच तास आधीच पेपर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्यादिवशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून 10 हून अधिक आरोपींना अटक केली होती. याशिवाय गुजरात एटीएसची टीमही तपासासाठी इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाची कनिष्ठ लिपिकासाठी परीक्षा 29 जानेवारीला आज सकाळी 11:00 ते दुपारी 12 या वेळेत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार होती. मात्र सकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची प्रत जप्त करण्यात आली. त्यानंतर ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली.

9 लाख उमेदवार : या पेपरफुटीच्या प्रकरणाने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कनिष्ठ लिपिकाच्या 1181 जागांसाठी 9 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सरकारवर कठोर टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजप सरकारमध्ये गेल्या काही वर्षांपासून पेपर फोडण्याची परंपरा आहे. परीक्षेचे पेपर 20 पेक्षा जास्त वेळा लीक झाले आहेत. आपली माणसे सरकारी खात्यात टाकण्याचे कारस्थान भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांना तुरुंगात टाकावे. तसेच जबाबदार मंत्र्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे.

हेही वाचा : Shaligram Rock Ayodhya : आज गोरखपूर मध्ये पोहचतील शालिग्राम खडक, अयोध्येत रामाची मूर्ती बनवण्यासाठी वापरले जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.