गांधीनगर : गुजरातच्या सूरतमध्ये दृश्यम चित्रपटात घडतो तसा प्रकार समोर आला आहे. एका पोलीस स्थानकाच्या आवारात स्वच्छता मोहीम सुरू असताना तिथे चक्क मानवी सांगाडा आढळून आला.
रविवारी दुपारी या पोलीस स्थानकाच्या आवारात पडून असलेली जप्त केलेली वाहने काढण्यात येत होती. क्रेनच्या सहाय्याने ही वाहने उचलली असता, खाली एका मानवी सांगाड्याचे अवशेष दिसून आले. सुमारे दोन वर्षांनंतर याठिकाणची स्वच्छता करण्यात येत होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
या अवशेषांमध्ये कवटी आणि शरीराचे खालचे भाग यांचा समावेश होता. हा सांगाडा एखाद्या तीन ते चार वर्षांच्या मुलाचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सांगाड्याची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा : विदारक : संशयित कोरोना रुग्णांची तीन तासांहून अधिक लॅबसमोर अहवालाकरता प्रतीक्षा