गुजरातमध्ये सर्व 182 जागांचे निकाल हाती. भाजपला 156, काँग्रेसला 17 तर आम आदमी पक्षाला मिळाल्या 5 जागा. 4 जागांवर इतर अपक्षांचा विजय. तर हिमाचल प्रदेशात सर्व 68 जागांचे निकाल हाती. काँग्रेसला 40 तर भाजपला 25 जागा मिळाल्या. 3 अपक्ष उमेदवार विजयी.
Gujarat Himachal results update : गुजरातमध्ये 156 जागांसह भाजपला विक्रमी बहुमत तर हिमाचलमध्ये 40 जागांसह काँग्रेसची सत्ता - हिमाचल विधानसभा २०२२ लाईव्ह अपडेट
19:02 December 08
गुजरातमध्ये 156 जागांसह भाजपला विक्रमी बहुमत तर हिमाचलमध्ये 40 जागांसह काँग्रेसची सत्ता
18:19 December 08
जिग्नेश मेवाणी वडगाम विधानसभा मतदारसंघात अखेर विजयी
गुजरात निवडणुकीत काँग्रेस नेते जिग्नेश मेवाणी यांची सुरुवातीला पिछेहाट झाली होती. मात्र पुन्हा आघाडी घेत वडगाम विधानसभा मतदारसंघात विजयी झाले.
17:29 December 08
हिमाचलमध्ये पक्षाध्यक्ष मुख्यमंत्री ठरवतील - काँग्रेस नेते राजीव शुक्ला
हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री कोण होणार हे काँग्रेसचे अध्यक्ष ठरवतील असे पक्ष प्रभारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. तसेच घोडेबाजाराला वाव नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
17:17 December 08
जनतेने विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला, गुजरात विजयावर मोदींची प्रतिक्रिया
गुजरात विधानसभा निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींनी धन्यवाद गुजरात, असे म्हटले आहे. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल पाहून मी भारावून गेलो आहे, असे ते म्हणाले. जनतेने विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.
16:53 December 08
हिमाचल प्रदेशातील जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण करणार - राहुल गांधी
हिमाचल प्रदेशातील जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
16:32 December 08
लोकशाहीत हारजीत ही होतच असते, चुका सुधारू - खरगे
गुजरात निवडणुकीत जे विजयी झाले त्यांचे श्रेय आपण घेत नाही असे काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. लोकशाहीत हारजीत ही होतच असते. हा आमचा वैचारिक लढा आहे. आम्ही उणिवा सुधारू आणि लढत राहू, असेही काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी स्पष्ट केले.
16:24 December 08
हिमाचल प्रदेशचे निवर्तमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द
हिमाचल प्रदेशचे निवर्तमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर सिमला येथील राजभवनात पोहोचले. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
15:53 December 08
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची संपूर्ण निकालानंतर चंदीगडमध्ये बैठक
निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस हिमाचल प्रदेशातील आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक चंदीगडमध्ये घेणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांना सर्वाधिकार देण्याचा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे. एआयसीसीचे राज्याचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी हे सांगितले.
15:44 December 08
गुजरात हिमाचल प्रदेश निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमिवर शेअरबाजारात चलबिचल
गुजरातमध्ये भाजपने विक्रमी बहुमताची आघाडी मिळवली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टीत चढ-उतार दिसून आला. तर शेवटी बाजार बंद होताना सेन्सेक्स १६० अंकांनी वाढून ६२,५७० वर तर निफ्टी ४८ अंकांनी वधारून १८,६०९ वर बंद झाला.
15:40 December 08
गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा १ लाख ९२ हजार मतांनी विजय
गुजरात निवडणूक : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया मतदारसंघात १ लाख ९२ हजार अशा विक्रमी मतांनी विजय झाला आहे.
15:17 December 08
आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी पराभूत
गुजरातमध्ये खंभलिया मतदारसंघात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी पराभूत झाले आहेत. भाजपच्या उमेदवाराची सुरुवातीच्या काळात पिछेहाट झाली मात्र नंतर मुंसडी मारून विजय मिळवला.
15:11 December 08
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार
हिमाचल प्रदेशचे निवर्तमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर थोड्याच वेळात राज्यपालांकडे राजीनामा देणार आहेत. त्यांनीच ही बाब स्पष्ट केली आहे. हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव दिसत आहे. त्या पार्श्वभूमिवर ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.
14:57 December 08
गुजरातमधील यशानंतर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, खा. संजय सिंह यांनी मानले गुजराती मतदारांचे आभार
AAP ला फक्त 10 वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे गुजरातच्या लोकांचे आभार मानत असल्याचे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हटले आहे. भाजपचे होम टर्फ समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये 'आप'ला 35 लाख मते मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
14:36 December 08
गुजरातच्या जनतेने निवडणुकीत देशविरोधी घटकांना नाकारले - भूपेंद्र पटेल
गांधीनगर - गुजरातच्या जनतेने या निवडणुकीत देशविरोधी घटकांना नाकारले आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
14:01 December 08
12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता गुजरातचे मुख्यमंत्री शपथ घेणार - सी आर पाटील
येत्या 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता गुजरातचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील, असे प्रदेश भाजप प्रमुख सीआर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
13:50 December 08
गुजरातच्या लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला ते तोंडावर पडले - सी आर पाटील
गांधीनगर - इतर पक्षांनी कधीही पूर्ण होणार नाही अशी आश्वासने देऊन गुजरातच्या लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना योग्य उत्तर मिळाले असे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी म्हटले आहे.
13:41 December 08
गुजरात निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कोणाच्याच मन शंका नव्हती - शरद पवार
मुंबई - गुजरात निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्याच मन शंका नव्हती. अनेक निर्णय त्या राज्याच्या सोयीसाठी घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात नेण्यात आले. त्याचा परिणाम होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती त्यानुसार निकालही गुजरातमध्ये लागला आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
13:38 December 08
हिमाचल प्रदेशात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल - काँग्रेस
हिमाचल प्रदेशात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेस नेते एसएस सखू यांनी व्यक्त केला आहे. सध्या हिमाचल प्रदेश निवडणूक मतमोजणीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांना बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
13:33 December 08
गुजरातमध्ये भाजपच्या कामाचा विजय - हार्दिक पटेल
गुजरातमध्ये भाजपच्या कामाचा विजय आहे असे भाजप उमेदवार हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. तसेच पुढील 20 वर्षात करायच्या कामावर लक्ष केंद्रित करू, असेही ते म्हणाले. 'आप'शी स्पर्धा हेही पटेल यांनी स्पष्ट केले.
13:15 December 08
जामनगर उत्तरच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी मानले मतदारांचे आभार, 31 हजारवर मतांची आघाडी
ज्यांनी मला उमेदवार म्हणून आनंदाने स्वीकारले, माझ्यासाठी काम केले, लोकांशी संपर्क साधला मी त्या सर्वांचे आभार मानते असे भाजपच्या जामनगर उत्तरच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी म्हटले आहे. हा केवळ माझाच नाही तर आपल्या सर्वांचा विजय आहे, असे त्या म्हणाल्या आहे. त्यांनी 31 हजाराच्यावर मतांची आघाडी घेतली आहे.
13:12 December 08
आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी 14761 मतांनी पिछाडीवर
गुजरातमध्ये खंभलिया मतदारसंघातून आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी 14761 मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणी सुरू आहे.
12:49 December 08
182 जागांपैकी भाजपला 40 जागांवर विजय, तर 116 जागांवर आघाडी
182 जागांपैकी भाजपला 40 जागांवर विजय मिळाला आहे. तर 116 जागांवर आघाडी आहे. काँग्रेसला २, आपला १ आणि इतर १ जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस १५ जागांवर तर आप ४ आणि इतर २ जागांवर आघाडी आहेत.
12:22 December 08
हिमाचल प्रदेशात प्रतिभा वीरभद्र सिंह मुख्यमंत्री पदाच्या दावेदार - विक्रमादित्य सिंह
हिमाचल प्रदेशात आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू आणि आमचे सरकार 5 वर्षे चालेल असा विश्वास काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रतिभा वीरभद्र सिंह या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांपैकी एक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
12:13 December 08
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी
हिमाचल प्रदेशात मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा जागेवर मतमोजणी पूर्ण झाली आहे. या जागेवर मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी झाले आहेत. आठही फेऱ्यांमध्ये सीएम जयराम सुरुवातीपासूनच पुढे होते. तर काँग्रेसचे उमेदवार चेतराम ठाकूर हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते.
12:09 December 08
गुजरातमध्ये भाजपला आघाडी, पुण्यात कार्यकर्त्यांचा पेढे वाटून जल्लोष
गुजरातमध्ये सकाळच्या सत्रात भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसे झाल्यास गुजरातमध्ये सातव्यांदा भाजप सत्ता मिळवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटत ढोल ताशा वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला.
11:58 December 08
गुजरात मोरबी मतदारसंघात भाजपच्या कांतीलाल अमृतिया यांची विजयाकडे वाटचाल
गुजरात निवडणुकीत मोरबी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कांतीलाल अमृतिया विजयाकडे वाटचाल करत आहेत. याच मतदारसंघात मोठी पूल दुर्घटना झाली होती.
11:51 December 08
हिमाचलमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या किंगमेकरची जबाबदारी
हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडींना अंतिम निकालानंतर वेग येण्याची शक्यता आहे. तेथे शक्य झाल्यास सत्ता स्थापनेसाठी जुळवा-जुळवी करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्याचे वृत्त आहे.
11:32 December 08
हिमाचल प्रदेशात भाजपचे बंडखोर ३ मतदारसंघात आघाडीवर
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर ३ मतदारसंघात आघाडीवर, तर काँग्रेसला ३४ जागांवर आघाडी.
11:28 December 08
गुजरातमध्ये वाघोडिया मतदारसंघात भाजपचे बंडखोर धर्मेंद्रसिंह वाघेला आघाडीवर
गुजरातमध्ये वाघोडिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर धर्मेंद्रसिंह वाघेला हे पक्षाचे अधिकृत उमेदवार अश्विन पटेल यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.
11:17 December 08
गांधीनगरमधील महिला भाजप कार्यकर्त्यांनी नाचून केला आनंद साजरा
गांधीनगरमधील महिला भाजप कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना नाचून आनंद साजरा केला. गुजरातमध्ये अधिकृत ट्रेंडनुसार भाजप 182 पैकी 152 जागांवर आघाडीवर आहे.
11:04 December 08
काँग्रेस पक्षाचे नेते जिग्नेश मेवाणी आघाडीवर
काँग्रेस पक्षाचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी वडगाममध्ये भाजपचे मणिभाई वाघेला यांना पिछाडीवर टाकले आहे.
10:53 December 08
हिमाचल प्रदेशमधील सुंदरनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राकेश कुमार जामवाल विजयी
हिमाचल प्रदेशमधील सुंदरनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राकेश कुमार जामवाल विजयी झाले आहेत.
10:38 December 08
भाजप गुजरातमध्ये नवा विक्रम रचणार - राजनाथ सिंह
गुजरातमध्ये प्रो-इन्कम्बन्सी आहे. आम्ही गुजरातमध्ये नवा विक्रम रचणार आहोत. राज्यातील जनतेचा पंतप्रधान मोदींवर अपार विश्वास आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचा विजयी आघाडी मिळत आहे. असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
10:21 December 08
हिमाचल प्रदेशात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला 32 जागांवर आघाडी
हिमाचल प्रदेशात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 31 जागांवर आणि अपक्ष-4 जागांवर आघाडीवर आहे.
10:11 December 08
विरमगाम विधानसभा मतदारसंघात भाजपचे हार्दिक पटेल आघाडीवर
गुजरात: विरमगाम विधानसभा मतदारसंघात भाजपचे हार्दिक पटेल आघाडीवर. काँग्रेसचे विद्यमान आमदार तिसऱ्या क्रमांकावर घसरले. 'आप' दुसऱ्या क्रमांकावर.
10:06 December 08
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 23,713 मतांनी आघाडीवर
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडिया मतदारसंघात एकूण 23,713 मतांनी आघाडीवर आहेत.
10:03 December 08
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 123 जागांवर आघाडी
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप 123 जागांवर, काँग्रेस 22 जागांवर, AAP 10 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर. निवडणूक आयोगाची माहिती.
10:00 December 08
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर 14,921 मतांनी आघाडीवर
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर त्यांच्या सेराज मतदारसंघात एकूण 14,921 मतांनी आघाडीवर आहेत.
09:53 December 08
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीत 127 पैकी 98 जागांवर भाजप आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीत 127 पैकी 98 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर आम आदमी पार्टी 10 जागांवर आघाडीवर आहे.
09:28 December 08
हिमाचल प्रदेशात काँग्रेस भाजपमध्ये काट्याची टक्कर दोन्ही पक्षांना 33 जागांवर आघाडी
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत 68 पैकी 33 जागांवर भाजप आणि काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचे ट्रेंड अशापद्धतीने दाखवत आहेत.
09:21 December 08
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपला ५० टक्के मतदान
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजपला ५० टक्के मतदान झाले आहे.
09:10 December 08
गुजरातमधील १८२ जागापैकी १२१ जागांवर भाजप आघाडीवर
गुजरातमधील १८२ जागापैकी १२१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४५ जागांवर तर आप १२ जागांवर तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहे.
09:08 December 08
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार काय आहे गुजरातमधील स्थिती?
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गुजरात, भाजप 8 जागांवर, कॉंग्रेस 3 आणि आप 1 जागेवर आघाडीवर आहे.
08:53 December 08
गुजरातमध्ये पोस्टल मतमोजणी पूर्ण, भाजप 124 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 53 आणि आप 3 जागांवर आघाडीवर
गुजरातमधील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरमगाममधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारा हार्दिक पटेल पिछाडीवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला असला तरी भाजप सध्या 130 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४५ आणि आम आदमी पार्टी केवळ दोन जागांवर आघाडीवर आहे.
08:45 December 08
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीत सेराजमध्ये जयराम ठाकूर आघाडीवर
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीत सेराजमध्ये जयराम ठाकूर आघाडीवर आहेत.
08:41 December 08
गुजरातमध्ये भाजप 128 जागांवर आघाडीवर
गुजरातमध्ये भाजप काँग्रेस आणि आम आदमी पार्टीपेक्षा खूप पुढे आहे. भाजप आता 128 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 40 जागांवर पुढे आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे.
08:33 December 08
सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप 32, काँग्रेस 8 आणि आप 4 जागांवर आघाडीवर
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप 32, काँग्रेस 8 आणि आप 4 जागांवर आघाडीवर आहे.
08:31 December 08
जनतेच्या आशीर्वादाने बहुमताने विजयी होऊ-काँग्रेस उमेदवार बाबूजी ठाकोर
आज मतमोजणी होत आहे. जनतेच्या आशीर्वादाने बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास काँग्रेसचे मानसा मतदारसंघाचे उमेदवार बाबूजी ठाकोर यांनी व्यक्त केला.
08:19 December 08
गुजरातमध्ये भाजप ८ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर
गुजरात विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे.
08:17 December 08
निकालापूर्वी या मतदारसंघात गरब्याची भाजपकडून तयारी
अहमदाबादमध्ये 21 विधानसभा जागांसाठी तीन मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, तर संपूर्ण गुजरातमध्ये 37 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. गुजरातमधील आपला विजय निश्चित मानून भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज गांधीनगर येथील पक्ष कार्यालयात गरब्याचे आयोजन केले आहे.
07:45 December 08
गुजरातसह हिमाचल प्रदेशमध्ये मतपत्रिकांवरील मतदान मोजणी सुरू
हिमाचलमध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या ४१२ उमेदवारांवर आज जनतेचा निर्णय येणार आहे. हिमाचलमध्ये प्रथा बदलणार की सत्ताबदल होणार, हे आजच्या ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीतून कळेल. मात्र, आज आठ वाजल्यापासून हिमाचलमध्ये एकाच वेळी 68 केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार आहे. दोन ते तीन तासांत हिमाचलमध्ये सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र समोर येऊ लागेल. मतमोजणीसाठी राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार आपापल्या भागात असतील. मात्र, मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे शिमल्यातच उपस्थित राहणार आहेत.
07:41 December 08
गुजरातच्या निवडणूक निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष, निवडणूक आयोगाकडून चोख सुरक्षा व्यवस्था
गुजरातच्या सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष असणार आहे. नि वडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रिया अखंडपणे पार पाडण्यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था अंमलात आणण्याबरोबरच कोणताही विलंब होऊ नये म्हणून मतदान मंडळाने पोस्टल मतपत्रिका आणि ईव्हीएम दोन्ही एकाच वेळी मोजण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मतमोजणी सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. गुजरातमध्ये 37 मतमोजणी केंद्रे असतील ज्यात राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 182 विधानसभा जागांचा समावेश असेल. अहमदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक तीन मतमोजणी केंद्रे आहेत तर सुरत आणि आनंद जिल्ह्यात प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्रे असतील. हिमाचल प्रदेशात, राज्यातील 59 ठिकाणी 68 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. 10,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी, रिटर्निंग अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचारी गुरुवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवर देखरेख करतील.
07:36 December 08
पोस्टल मतपत्रिकांनी मतमोजणी सुरू होईल, त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी

गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी सांगितले की, मतमोजणी प्रक्रियेसाठी 182 मतमोजणी निरीक्षक, 182 रिटर्निंग अधिकारी आणि 494 सहायक रिटर्निंग अधिकारी ड्युटीवर असतील. मतमोजणीसाठी अतिरिक्त ७८ सहायक निवडणूक अधिकारी असणार आहेत. याशिवाय 71 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकार्यांवर इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोस्टल मतपत्रिकांची पहिली मतमोजणी सकाळी 8.00 वाजता होईल आणि पोस्टल मतपत्रिकांची तसेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.
07:30 December 08
हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागा, बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता लागणार
हिमाचलमध्ये एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसते. (Exit Poll Himachal 2022) हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे.
07:25 December 08
गुजरातच्या एक्सिट पोलचा काय होता अंदाज, कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?
गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असतानाच एक्झिट पोलचे निकाल समोर आले होते. बहुतांश सर्वेक्षणे गुजरातमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 182 जागांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पी मार्क-रिपब्लिकने भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याचे दाखवले आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला 128 ते 148 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसला 30 ते 42 आणि आपला 2 ते 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
07:16 December 08
कुतियानामध्ये दहा वर्षे भाजपसह काँग्रेसला मिळाली नाही सत्ता
पोरबंदरमधील कुतियाना विधानसभा मतदारसंघात (kutiyana assembly seat) गेल्या 10 वर्षांपासून भाजप किंवा काँग्रेस या दोघांनाही पाय रोवता आलेला नाही. कांधल जडेजा (kandhal jadeja) हे गेले दोन टर्म येथून राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. काळानुसार इथली समीकरणे बदलली आणि कांधल जडेजा यंदा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. कुतियानाची जनता पुन्हा एकदा कांधल जडेजा यांना आमदार म्हणून निवडून देणार की नाही, हे आज स्पष्ट होईल. (kutiyana assembly seat result).
06:32 December 08
Gujarat Himachal Pradesh results update :
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूकीची (Gujrat Election 2022) मतमोजणी 8 डिसेंबर रोजी सकाळी 8:00 वाजता राज्यभरातील 37 मतदान केंद्रांवर सुरू होईल. मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती म्हणाले, अहमदाबादमध्ये 3 मतमोजणी केंद्रे, सुरतमध्ये 2 मतमोजणी केंद्रे आणि आनंदमध्ये 2 मतमोजणी केंद्रे आहेत. याशिवाय सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एकाच वेळी मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांचे एकूण 25,463 बॅलेट युनिट आणि 93 जागांच्या 37,482 बॅलेट युनिट्सची मोजणी होणार आहे. त्यानंतर दुस-या टप्प्यातील 14 जिल्हे घेण्यात येणार आहेत.(Gujrat election vote counting) किती अधिकारी मतमोजणी करणार? : राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रांनी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. भारती पुढे म्हणाले की, संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी 182 मतमोजणी निरीक्षक, 182 निवडणूक अधिकारी आणि 494 सहायक निवडणूक अधिकारी कर्तव्यावर असतील. मतमोजणीसाठी अतिरिक्त ७८ सहायक निवडणूक अधिकारी असणार आहेत. या व्यतिरिक्त, 71 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसारित पोस्टल मतपत्र प्रणालीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होत आहे. ८ डिसेंबरला ४१२ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या राजकीय लढाईत अनेक चेहऱ्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचाही त्यात समावेश आहे. त्यांच्याकडे ३७ वर्षांनंतर प्रथा बदलून इतिहास रचण्याची संधी असेल. जर भाजपने ही निवडणूक जिंकली तर राज्यात 37 वर्षांत प्रथमच एखादा राजकीय पक्ष सरकारची पुनरावृत्ती करेल. भाजपचे असे काही चेहरे आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात नसतील, पण हिमाचलच्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांची विश्वासार्हता पण पणाला लागली आहे. (Himachal election 2022) (Himachal Pradesh poll result).