ETV Bharat / bharat

Gujrat Election 2022 : मोरबी दुर्घटनेत अनेकांना वाचविणाऱ्या भाजपचे उमेदवार कांती यांचा विजय

यावेळी गुजरात निवडणुकीच्या निकालादरम्यान (Gujrat Election Result) मोरबी जिल्ह्याची (Morbi assembly seat) सर्वाधिक चर्चा होणार आहे. निवडणुकीच्या अवघ्या महिनाभर आधी घडलेल्या मोरबी पुल दुर्घटनेमुळे (Morbi bridge incident) ही सीट चर्चेत आली होती. आता येथे कोणता पक्ष बाजी मारणार, हे आज समजणार. (Morbi assembly seat result).

author img

By

Published : Dec 8, 2022, 5:20 AM IST

Updated : Dec 8, 2022, 3:38 PM IST

Gujrat Election 2022
Gujrat Election 2022

अहमदाबाद : मोरबी दुर्घटनेत माचू नदीत उडी अनेकांचे प्राण वाचविणारे कांती यांना प्रचंड मतांनी विजय मिळाला आहे. गुजरातच्या निवडणुकीत भाजपने कांती अमृतिया यांना (Morbi assembly seat) मोरबी मतदारसंघातून तिकीट दिले होते. ( Gujrat Election Result ). काँग्रेसने त्यांच्या विरोधात ब्रिजेश मेर्जा यांना तिकीट दिले. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत दोघे पुन्हा आमनेसामने आले. मात्र, त्यावेळी ब्रिजेश मेर्जा यांनी कांती अमृतिया यांचा पराभव केला आणि ही जागा काँग्रेसकडे गेली. पण आणखी एक मनोरंजक ट्विस्ट आला जेव्हा ब्रिजेश मेरजा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि 2020 मध्ये राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या जागेवर पोटनिवडणूक झाली. 2020 च्या पोटनिवडणुकीत, भाजपने पाच वेळा निवडून आलेल्या कांती अमृतिया यांच्या जागी पक्षांतर करणारे ब्रिजेश मेरजा यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले होते. त्यांच्याकडे सध्या भूपेंद्र पटेल सरकारमध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार आहे.

मोरबी सीटचे महत्त्व : मोरबी हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. मोरबीमध्ये घड्याळे, पाईप्स, सिरॅमिक (मोरबी सिरॅमिक इंडस्ट्री) व्यतिरिक्त पेपर मिल उद्योग विकसित झाला असून येथून जगातील अनेक देशांमध्ये सिरॅमिक टाइल्सची निर्यात केली जाते. त्याद्वारे सरकारला परकीय चलन देखील मिळते. त्यामुळे मोरबीवासी दरवर्षी करोडो रुपयांचा कर भरतात. दरडोई उत्पन्नात मोरबी तालुका गुजरातमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आघाडीवर आहे. 65 मोरबी मालिया विधानसभा सीटवर पाटीदारांचे वर्चस्व आहे. ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. या जागेवर एकूण 2,70,906 मतदार नोंदणीकृत आहेत. ज्यामध्ये 1,41,583 पुरुष आणि 1,29,322 महिला आणि 2 इतर मतदार आहेत.

मोरबीमधील मतदानाची टक्केवारी : यावेळी मोरबी जिल्ह्यात एकूण मतदान 69.95 % होते (मोरबीमध्ये कमी मतदान). तर 2017 मध्ये येथे 73.65 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच यंदा बाकी राज्यातील जागांप्रमाणे मोरबीतही मतदानात घट झाल्याचे दिसून आले आहे. भाजपने या जागेवरून पुन्हा कांती अमृतिया यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने जयंतीलाल पटेल व आम आदमी पक्षाने पंकज रणसारिया यांना निवडणुकीत उतरवले आहे. मात्र, यावेळी भाजपसमोर मोरबी पूल दूर्घटनेमुळे विजयाचे मोठे आव्हान आहे. निवडणुकीच्या एक महिना आधी घडलेल्या या घटनेचा ठसा अजूनही मतदारांच्या मनावर आहे. 2017 च्या निवडणुकीतही भाजपचे उमेदवार कांती अमृतिया यांचा पराभव झाला होता.

जातीय समीकरण : मोरबी हा पाटीदारांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे पाटीदारांची व्होट बँक खूप मजबूत आहे. 2015 मध्ये पाटीदारांना आंदोलनच्या वेळी वेळी हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने आंदोलन समितीचे नेते, अधिकारी आणि अनेक तरुणांवर अंदाधुंद गुन्हे दाखल केले. ते हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हा भाजप सरकारसाठी सर्वात मोठा फॅक्टर ठरू शकतो. पाटीदारांची नाराजी भाजपला मोरबीमध्ये महागात पडू शकते. तर दुसरीकडे सततच्या वाढत्या महागाईने उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. मोरबी हे सिरॅमिक उद्योग आणि घड्याळ उद्योगाचे केंद्र आहे. त्यामुळे येथील व्यापारीही विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात हत्यार उपसत आहेत. यामुळे यंदा मोरबी जागा गुजरातमधील हॉट सीट बनली आहे.

गेल्या दोन निवडणुकांमधील स्थिती : यावेळी मोरबीच्या मतदारांनी निवडणुकीत फारसा रस दाखवला नसल्याचे दिसून आले आहे. येथे सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली, मात्र मतदानाचा वेग खूपच कमी होता. जिल्ह्यात एकूण 69.95 टक्के मतदान झाले. 2012 च्या निवडणुकीत भाजपने मोरबी विधानसभा मतदारसंघातून कांती अमृतिया यांना तिकीट दिले होते. त्यावेळी त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे ब्रिजेश मेरजा हे होते. त्या निवडणुकीत कांती अमृतिया यांनी बाडी मारली होती. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत हेच दोघे पुन्हा आमनेसामने आले. मात्र त्यावेळी ब्रिजेश मेरजा यांनी कांती अमृतिया यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2020 मध्ये राज्यसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजेश मेरजा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि भाजपने त्यावेळी या जागेवरून पराभूत झालेल्या ब्रिजेश मेरजा यांना तिकीट दिले. विशेष म्हणजे ते तेथून जिंकून आले आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले.

पूल दुर्घटनेचा परिणाम होणार? : ऑक्टोबर महिन्यात मोरबी जिल्ह्यात पूल कोसळून 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ही सीट चर्चेत आली आहे. या घटनेमुळे ही जागा जिंकणे भाजपला अवघड जाणार हे निश्चित आहे. त्यातही भाजपने या जागेवरून कांती अमृतिया यांना उमेदवारी दिली आहे, जे पूल दुर्घटनेत पाण्यात उडी मारून जीव वाचवताना दिसले होते. या दुर्घटनेच्या जखमा अजून भरल्या नाहीत. त्यामुळे या जागेवर यंदा कमळ फुलणार की पंजा राज्य करणार हे येणारा काळच सांगेल.

Last Updated : Dec 8, 2022, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.