नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणुचा प्रसार झाला आहे. कोरोनाची अनेक नेत्यांना लागण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. रॅलीत बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी वडोदरामध्ये एका सभेत भाषण करताना रूपाणी स्टेजवरच कोसळले. त्यांना अहमदाबादला आणण्यात आले आणि यूएन मेहता रुग्णालयात दाखल केले आहे.
कोरोनाची बड्या नेत्यांना लागण -
कोरोनाची अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे. राज्यसभा खासदार अभय भारद्वाज यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ याच्या मंत्रिमंडळात असेलेले चेतन चौहान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून खासदारकी भूषवलेले एच. वसंतकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अशोक चव्हाण यांसारखे कॅबिनेट मंत्री कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.