ETV Bharat / bharat

गुजरात : बालकाला सोडून गेलेल्या पित्याचा पोलिसांना लागला शोध; भयंकर प्रकरणाचा झाला उलगडा!

शुक्रवारी रात्री पेठापूरमध्ये अनाथ बालक आढळून आले होता. त्याच्या पालकांचा शोध घेताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकाचा पिता सचिन दीक्षितने बालकाची आई मेहंदी पेथानीची हत्या केली.

हिना मुलासमवेत
हिना मुलासमवेत
author img

By

Published : Oct 11, 2021, 5:52 AM IST

Updated : Oct 12, 2021, 2:29 PM IST

अहमदाबाद (गांधीनगर) - गुन्ह्याचा शोध घेताना प्रकरणाला नाट्यमय वळण लागल्याचा गुजरात पोलिसांनी अनुभव घेतला आहे. पथापूर कांडमध्ये एका बालकाला पित्याने सोडून पळ काढल्याची घटना घडली. या पित्याचा गुजरात पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी पित्याला राजस्थानमधून गांधीनगरला आणले. त्याची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

गुजरात गुन्हे न्यूज
गुजरात गुन्हे न्यूज

शुक्रवारी रात्री पेठापूरमध्ये अनाथ बालक आढळून आले होता. त्याच्या पालकांचा शोध घेताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकाचा पिता सचिन दीक्षितने बालकाची आई मेहंदी पेथानीची हत्या केली. आरोपीने वडोदरामध्ये भाड्याने घेतलेल्या घरामध्ये ठेवलेला हिनाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा- भाडेकरुने एवढा दिला त्रास, घरमालकाने घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी हा व्हिडिओतून सांगितली आपबीती

वादामधून केली पत्नीची हत्या

आरोपी सचिनने पोलिसांना सांगितले, की तो कुटुंबासमवेत उत्तर प्रदेशला जात होता. त्याबाबत हिनाला सांगितल्यानंतर तिने सोबत राहण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतप्त झालेल्या सचिनने हिनाचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचा मृतदेह हा बॅगमध्ये पॅक करून स्वयंपाकघरात ठेवला. त्यानंतर तो बालकासमेवत घराबाहेर पडला. त्याने बालकाला गांधीनगरमधील पेठापूरच्या स्वामीनारायण गोशाळेतील पायऱ्यांवर ठेवले. त्या ठिकाणची आरोपीला माहिती होती. गोशाळेतून दूध आणि तूप आणण्यासाठी आरोपी नेहमी जात होता. त्यामुळे बालकाला तिथे सोडून आरोपी उत्तर प्रदेशला गेला.

हिना मुलासमवेत
हिना मुलासमवेत

हेही वाचा- बायकोला ठार मारण्यासाठी या नवऱ्याने केले असे काही, की तपासयंत्रणाही पडल्या बुचकळ्यात

दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप राहायचे-

सचिन दीक्षित आणि मेहंदी उर्फ हिना पेथानी यांचे एकमेकांवर प्रेम होते. ते दोघे २०१८ मध्ये एका शोरुमध्ये भेटले होते. त्यानंतर काही दिवसात सचिनने वडोदरामधील ओझोन कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. सचिन आणि हिना यांनी दर्शन ओएसिसमध्ये भाड्याने घर घेतले. सचिन बडोदामध्ये ५ दिवस आणि गांधीनगरमध्ये शनिवारी व रविवारी कुटुंबासह राहत होता. दोघे लिव्ह इन रिलेशनशिप राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. २०२० मध्ये बालकाचा जन्म झाला होता.

हेही वाचा- Vaccination : लवकरच लहान मुलांचे लसीकरण, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस

सचिनने हिनाला घटस्फोट झाल्याची मारली होती थाप

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सचिनवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. हिनाच्या आईचे १० वर्षांपूर्वी निधन झाले. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. ती जुनागड केशोर येथील रहिवाशी होती. सचिनच्या पत्नीची माहिती अद्याप मिळालेली नाही. सचिन हा विवाहित असल्याची हिनाला माहिती होती. पण, सचिनने घटस्फोट झाल्याचे हिनाला सांगितले होते.

Last Updated : Oct 12, 2021, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.