गुजरात : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. या जागा राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये असून या टप्प्यात एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पहिल्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.४८ टक्के मतदान झाले. त्यानंतरची शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.88 मतदान झाले आहे. Gujarat Assembly Polls, 56.88 percent polling was recorded till 5 pm
गुजरात भाजपचे प्रमुख सी.आर.पाटील : गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील म्हणाले की, मोदी जादू प्रत्येक वेळी, सर्वत्र काम करते. ती लोकांच्या हृदयात आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि तो त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहे.
लोकांनी भाजपला हटवण्याचा संकल्प केला: काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया म्हणाले की, लोकांनी भाजपला हटवण्याचा संकल्प केला आहे. भाजपला याची माहिती आहे, म्हणून त्यांनी वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात फेरबदल केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
तापी येथे सर्वाधिक 64.27 टक्के तर जामनगरमध्ये सर्वात कमी 42.26 टक्के मतदान झाले.
जिल्हावार झालेले मतदान
अमरेली 44.62
भरुच 55.45
भावनगर 45.91
बोटाद 43.67
डांग 58.55
देवभूमी द्वारका 46.55
गीर सोमनाथ 50.89
जामनगर 42.26
जुनागड 46.03
कच्छ 45.45
मोरबी 53.75
नर्मदा 63.88
नवसारी 55.10
पोरबंदर ४३.१२
राजकोट 46.67
सुरत ४७.०१
सुरेंद्रनगर 48.60
तापी ६४.२७
वलसाड ५३.४९