ETV Bharat / bharat

Gujarat Results: भूपेंद्रने नरेंद्रचा रेकॉर्ड तोडला! गुजरात विधासभा निकालानंतर मोदींचे प्रतिपादन - Gujarat Assembly Election 2022

मी जनतेसमोर नतमस्तक होतो. मी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील लोकांचे विनम्र आभार व्यक्त करतो अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निकालावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Gujarat Results) त्यांनी आज गुरुवार (8 डिसेंबर)रोजी सायंकाळच्या सुमारास दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. जिथे भाजपचा पूर्ण विजय झाला नाही, तिथे पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी ही जनतेची भाजपप्रती असलेल्या आपुलकीची साक्ष आहे असही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

PM Modi speaking at the Delhi BJP headquarters
गुजरात विधासभा निकालानंतर दिल्ली भाजप मुख्यालयात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Dec 8, 2022, 9:50 PM IST

नवी दिल्ली - गुजरातच्या जनतेने विक्रम मोडण्याचाही विक्रम केला आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश भाजपला देऊन राज्यातील जनतेने नवा इतिहास रचला आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेची प्रशंसा केली आहे. (Gujarat assembly polls) जात, वर्ग, समाज, या परिकडे जात जनतेने भाजपला मतदान केले आहे असा दावाही मोदी यांनी यावेळी बोलताना केला आहे. त्यावरून विकसित भारतासाठी सामान्य माणसाची आकांक्षा किती प्रबळ आहे हे दिसते. तसेच, भाजप आज जिथे पोहोचला आहे, तिथपर्यंत तो असाच नाही पोहोचला. यासाठी जनसंघाच्या काळापासून संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात अनेक कुटुंब उद्वस्त झाले आहेत असही ते म्हणाले आहेत.

गुजरात विधासभा निकालानंतर दिल्ली भाजप मुख्यालयात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

घराणेशाही म्हणत अप्रत्यक्ष काँग्रेसवर टीका - येणारे २५ वर्ष हे फक्त विकासाच्या राजकारणावर असणार आहेत. भाजपचे समर्थन तरुणांच्या नव्या विचारांचे प्रतिक आहे. भाजपला मतदान म्हणजे दलित, वंचित, सोशितांचे सशक्तिकरण आहे. (Gujarat Himachal Assembly results) लोकांनी भाजपला मत दिले कारण भाजप देशाच्या हितासाठी मोठ्यात मोठे आणि कठोरात कठोर निर्णय घेण्याची धमक ठेवतो असा दावा मोदी यांनी यावेळी केला आहे. याचवेळी त्यांनी घराणेशाही म्हणत अप्रत्यक्ष काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपचे जे वाढते जनसमर्थन आहे ते दाखवते की घराणेशाही आणि भ्रष्टाचारविरोधात जनआक्रोश वाढत आहे. मी या गोष्टीला लोकशाहीच्या दृष्टीकोनाने शुभ संकेत म्हणून पाहतो असही ते म्हणाले आहेत.

भूपेंद्रने नरेंद्रचा रेकॉर्ड तोडला - निवडणुकीच्यावेळी गुजरातच्या जनतेला सांगितले होते की यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडला पाहिजे. भूपेंद्र नरेंद्रचा रेकॉर्ड तोडेल यासाठी नरेंद्र प्रयत्न करेल. गुजरातच्या जनतेने रेकॉर्ड तोडण्याचाही रेकॉर्ड केला आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वाधित जनादेश भाजपला देवून गुजरातच्या जनतेने नवा इतिहास रचला आहे. अडीच दशक सत्तेत असताना गुजरातच्या नागरिकांनी दिलेला हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे अस देखील मोदी म्हणाले आहेत.

सरकारचे काम प्रत्यक्ष नजरेत येते - भाजप गुजरातच्या प्रत्येक कुटुंबाचा भाग आहे. गुजरातमध्ये यावेळे एक कोटी पेक्षा जास्त असे मतदार होते ज्यांनी मतदान केले, पण ते हे मतदार होते ज्यांनी कधीच काँग्रेस शासनाला पाहिले नव्हते. त्यांनी फक्त भाजप सरकारला पाहिले होते. तरुण प्रश्न विचारतात, शाहनिशा करतात आणि मग मतदान करतात. ते अनुभवाशिवाय मतदान करत नाहीत. त्यांना सरकारचे काम प्रत्यक्ष नजरेत येते तेव्हाच ते मतदान करतात. यामधील अनेत तरुणांनी भाजपला सर्वाधिक प्रमाणात मतदान केल्याचाही दावा मोदी यांनी यावेळी केला आहे.

देश मोठे लक्ष्य निश्चित करतो - मी मोठ-मोठ्या तज्ज्ञांना आठवण करु देऊ इच्छित आहे की, गुजरात निवडणुकीत भाजपचे आवाहन होते 'विकसित गुजरातपासून विकसित भारताचं निर्माण'. गुजरातच्या निकालाने सिद्ध केले आहे की, सामान्य नागरिकात विकसित भारतासाठी किती प्रबळ आकांक्षा आहे. विचार स्वच्छ आहेत. देशासमोर जेव्हा एखादे आव्हान असते तेव्हा देशाच्या जनतेचा भाजपवर विश्वास असतो. जेव्हा देश मोठे लक्ष्य निश्चित करतो तेव्हा देशवासियांचा विश्वास हा भाजपवर असतो असही ते म्हणाले आहेत.

प्रत्येक वर्गापर्यंत सरकारी योजना - भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या संघटनशक्तीवर विश्वास ठेऊनच रणनीती बनवते आणि यशस्वी होते. अनेक चढ-उतार आले. पण आम्ही आदर्श आणि मुल्यांवर राहणे पसंत केले आहे. गेल्या आठ वर्षांत देशात एक खूप मोठा बदल अनुभवण्यात आला आहे. हा बदल कार्य आणि कार्यशैलीचा आहे. भाजप सरकार कामाला लहान मानत नाही. भाजप सरकारांनी गरिबांसाठी पक्के घर, शौचालय, मोफत जेवण, उपचार, इंटरनेट अशा अनेक मुलभूत सुविधांना महत्त्व दिले आहे. या गोष्टींकडे पूर्वी बघितले जात नव्हते. दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे आज प्रत्येक वर्गापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग केला जातोय असही ते म्हणाले आहेत.

मातृभूमी सर्वांना एक ठेवते - आम्ही फक्त घोषणा करत नाही. आम्ही राष्ट्रनिर्माणाच्या व्यापक मिशनसाठी काम करतो आहोत. त्यामुळे फक्त पाच वर्षाच्या राजकीय नफा-तोट्याला बघून आम्ही घोषणा करत नाही. आमच्या प्रत्येक घोषणेमागे दूरदृष्टीचा विचार असतो. देशात आज कोणताही संशय नाही. देश समृद्ध झाला तर सगळ्यांची समृद्धी होणार हे निश्चित आहे. जे राजकीय पक्ष स्वत:च्या तात्पुरत्या फायद्यासाठी समाजात भेद निर्माण करुन राष्ट्रासमोर नवी समस्या निर्माण करतात त्यांना देशाची जनता, तरुण पिढी पाहत आहे. भारताचे भविष्य फॉल्ट लाईन्सला वाढवून नाही तर त्या लाईन्स कमी करुन चांगले होणार आहे. कधी भाषा, क्षेत्र, खाद्यपदार्थ अशा अनेक विविध कारणांमुळे वाद निर्माण केला जातो. पण एकत्र राहण्यासाठी एकच कारण भरपूर आहे ते म्हणजे ही मातृभूमी आणि हा देश. हा आमचा भारत आहे. भाषा, क्षेत्रासाठी भांडण होतील, पण मातृभूमी सर्वांना एक ठेवते असही ते म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.