ETV Bharat / bharat

Groom On JCB Machine : वराची लग्नमंडपात जेसीबीतून एंट्री! पाहा व्हिडिओ - गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील एका वराला आपल्या लग्नात काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे त्याने चक्क जेसीबीतून वरात काढली. वराच्या या एन्ट्रीची परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे.

Groom On JCB Machine
वराची लग्नमंडपात जेसीबीतून एंट्री
author img

By

Published : Feb 4, 2023, 8:45 AM IST

लग्नमंडपात जेसीबीतून एंट्री

नवसारी (गुजरात) : गुजरातमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे. गुजराती तरुण त्यांचे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक अनोख्या थीम डिझाइन करत आहेत. आता गुजरातच्या दक्षिण भागात असलेल्या नवसारी जिल्ह्यात एक अनोखी मिरवणूक पाहायला मिळाली आहे. या मिरवणुकीत वर घोडा किंवा गाडीतून आलेला नाही, तर तो चक्क जेसीबीमधून आला! जे जेसीबी घरे पाडण्यासाठी किंवा खोदण्यासाठी वापरले जाते, त्याने हा वर आपल्या वधूच्या घरी पोहोचला.

लग्नात काहीतरी वेगळे करायचे होते : घोडिया पटेल समाजातील या वराचा आदिवासी परंपरेनुसार विवाह झाला. गुजरातमधील खेड्यापाड्यातील तरुणाई ग्रामीण जीवनशैलीचे पालन करतात. कधी लग्नात गावठी पोशाख पाहायला मिळतो, तर कधी लग्नात गावाची थीम पाळली जाते. नवसारी जिल्ह्यातल्या चिखलीतील कालियारी गावचा रहिवासी असलेल्या या वराला आपल्या लग्नात काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे त्याने चक्क जेसीबीतून वरात काढली. वराच्या या एन्ट्रीची परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : या तरुणाने वरातीसाठी जेसीबी फुलांनी सजवला. त्यात बसण्यासाठी मंडप बनवला आणि त्यात सोफाही ठेवला गेला. एवढेच नाही तर जेसीबीला मंडपाच्या रंगीबेरंगी कापडाने सजवले होते. जेसीबीमध्ये बसून वर आणि त्याचे नातेवाईक मुलीच्या घरी गेले. तर जेसीबीसमोर लग्नाची मिरवणूक नाचत होती. गावातील लोकांनी या पूर्ण मिरवणुकीचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ काही वेळातच संपूर्ण गुजरातमध्ये पाहिला गेला.

मोदींचा सोन्याचा पुतळा : गुजरातचे सुरत शहर हिरे आणि दागिने बनवण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. सुरतच्या या उद्योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा प्रयत्न करताना दिसतात. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश प्राप्त केले. त्यानंतर सुरतमधील एका ज्वेलरी कंपनीने पंतप्रधान मोदींचा चक्क सोन्याचा पुतळा बनवला आहे. गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकल्या त्यामुळे या ज्वेलरी कंपनीने मोदींचा 156 ग्रॅम सोन्याचा पुतळा बनवला आहे. मोदींची ही मूर्ती १८ कॅरेट सोन्यात तयार करण्यात आली आहे, जिला बनवण्यासाठी ३ महिने लागले.

हेही वाचा : PM Modi Gold Idol : मोदींची भन्नाट क्रेझ! चाहत्याने बनवली चक्क सोन्याची मूर्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.