ETV Bharat / bharat

Govt Cuts Price Of Tomato : नागरिकांना दिलासा, केंद्र सरकारने अनुदानित टोमॅटोच्या किमतीत केली 'इतकी' कपात

देशभरात टोमॅटोची किरकोळ किंमत 120 रुपयाच्या आसपास आहे. मात्र काही ठिकाणी टोमॅटो 245 रुपये किंमतीने विकला जातो. त्यामुळे केंद्र सरकराने अनुदानित टोमॅटो 70 रुपये किलोने विकण्याचे जाहीर केले आहे.

author img

By

Published : Jul 20, 2023, 10:23 AM IST

Govt Cuts Price of Tomato
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशभरात टोमॅटोच्या किमतीने हाहाकार उडाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मात्र केंद्र सरकारने अनुदानित टोमॅटोच्या किमती 80 रुपयांवरून आता 70 रुपये प्रति किलो केल्या आहेत. नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) मार्फत केंद्र सरकार दिल्ली आणि इतर काही प्रमुख शहरांमध्ये 80 रुपये किलोच्या अनुदानित दराने लोकांना टोमॅटो विकत आहे.

प्रमुख शहरात टोमॅटोचे दर भिडले गगणाला : टोमॅटोच्या किरकोळ किमती 120 रुपये किलोच्या आसपास आहेत. तर काही ठिकाणी टोमॅटो 245 रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. राजधानी दिल्लीत टोमॅटोचा दर 120 रुपये प्रति किलोवर आला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने NCCF आणि NAFED ला 20 जुलै 2023 पासून 70 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची किरकोळ विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. टोमॅटोच्या किमतीतील घसरलेला कल लक्षात घेऊन हा दर निश्चित करण्याचे ठरवण्यात आल्याचे जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दर 70 रुपये केल्यामुळे गृहिणींना फायदा : केंद्र सरकारने NCCF आणि NAFED द्वारे खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला 90 रुपये प्रति किलो दराने विकले गेले होते. केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानित टोमॅटोचे दर 16 जुलै 2023 पासून 80 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आले. त्यानंतर आता सरकारने टोमॅटो 70 रुपये प्रति किलो दर केल्याने ग्राहकांना आणखी फायदा होईल, असे जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या निर्देशानुसार NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून टोमॅटोची एकाच वेळी खरेदी सुरू केली होती.

दिल्ली एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री : सरकारने नागरिकांना टोमॅटोच्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी दिल्ली एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री 14 जुलै 2023 पासून सुरू केली होती. 18 जुलै 2023 पर्यंत NCCF आणि NAFED द्वारे एकूण 391 टन टोमॅटोची खरेदी करण्यात आली होती. यातील टोमॅटो दिल्ली एनसीआर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किरकोळ बाजारात ग्राहकांना विकले जात आहेत.

टोमॅटोची किरकोळ किंमत 119.29 रुपये किलो : बुधवारी टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत 119.29 रुपये किलो असल्याचे ग्राहक व्यवहार विभागाने जारी केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. टोमॅटोची कमाल किरकोळ किंमत 245 रुपये प्रति किलो आहे. तर किमान किरकोळ किंमत 40 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर रविवारी 178 रुपये प्रति किलोवरून गुरुवारी सरासरी 120 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले आहेत.

मुंबईत टोमॅटो 155 रुपये किलो : टोमॅटोची किंमत गगणाला भिडल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. सध्या मुंबईत टोमॅटो 155 रुपये किलो, चेन्नईत 132 रुपये आणि कोलकात्यात 143 रुपये किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटोच्या किमती साधारणपणे जुलै ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत वाढतात. हे चारही महिने टोमॅटोच्या कमी उत्पादनाचे महिने असतात. पावसाळ्यामुळे आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.