ETV Bharat / bharat

१५ जूननंतर दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य, वाचा हॉलमार्किंग म्हणजे काय.. - Gold Hallmarking

केंद्र सरकारने 15 जून नंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचं काही सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. दरम्यान, त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आधीचा स्टॉक विक्रीअभावी दुकानातच आहे. या मालाची विक्री करण्यासाठी सराफा व्यापारी सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मागत आहेत.

government-extended-deadline-for-jewellery-hallmark-till-15-june
दागिने
author img

By

Published : May 29, 2021, 9:54 AM IST

Updated : Jun 18, 2021, 8:45 AM IST

रायपुर (छत्तीसगढ) - 15 जूननंतर देशात सोन्यावर हॉलमार्किंग (hallmarking) अनिवार्य असेल. म्हणजेच 15नंतर ज्वेलर्स (jewellers) केवळ हॉलमार्क असलेलेच दागिने विकतील. हॉलमार्किंग 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने शिथिलता देत तारीख 15 जून पर्यंत वाढवली आहे.

15 जूननंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य -

केंद्र सरकारने 15 जून नंतर सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचं काही सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. दरम्यान, त्यांच्या काही मागण्यादेखील आहेत. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आधीचा स्टॉक विक्रीअभावी दुकानातच आहे. या मालाची विक्री करण्यासाठी सराफा व्यापारी सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मागत आहेत.

सराफा व्यापाऱ्यांची मागणी -

छत्तीसगढ मध्ये सध्या हॉलमार्किंग करणाऱ्या सहा लॅब आहेत. यापैकी 5 रायपुर, दोन दुर्ग आणि एक राजनांदगांवमध्ये आहे. छत्तीसगढमध्ये जवळपास 5500 सराफा दुकाने आहेत. रायपूरमध्येच 1500 सराफा दुकानं आहेत. अशात 8 लॅब असून एवढं मोठं हॉलमार्किंगचं काम होणं शक्य नाही. त्यामुळे सराफा असोसिएशनने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक हॉलमार्किंग सेंटर उघडण्याची मागणी केली आहे. याशिवाय रायपुर सराफा असोसिएशनने 20 कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्किंगमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. लोक 20 कॅरेट सोन्याचे दागिने बनवून घेतात. त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांकडे 20 कॅरेटचे दागिने आहेत.

१५ जूननंतर दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य..

हॉलमार्किंग का गरजेचं?

हॉलमार्क सरकारी गॅरंटी आहे. केंद्र सरकार सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग वापरण्यास प्रोत्साहन देत आहे. हॉलमार्क ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (bureau of indian standards) ठरवते. सोन्याचा शिक्का किंवा दागिन्यावर हॉलमार्कसह बीआयएस (BIS) चा लोगो लावणंदेखील गरजेचं आहे. ग्राहकांना नकली माल विकला जाऊ नये आणि व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी हॉलमार्किंग महत्वाचं आहे. हॉलमार्किंगचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही ते सोनं विकायला काढाल तेव्हा त्याची डेप्रिसिएशन कॉस्ट कापली जाणार नाही.

हॉलमार्क म्हणजे काय?

तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असलेच. तर हॉलमार्क म्हणजे कोणत्याही दागिन्यांची शुद्धता पारखल्यानंतर लावण्यात येणारे बीआयएस (BIS) लोगो. यावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते.

  • हॉलमार्कवर BIS बीआयएसचा त्रिकोणी लोगो असतो.
  • तसेच त्यावर हॉलमार्किंग केंद्राचाही लोगो असतो.
  • त्यावर सोन्याची शुद्धता लिहीलेली असते.
  • दागिने बनवल्याचे वर्ष लिहिले असते.
  • ज्वेलरचा लोगो असतो.

हॉलमार्किंगमुळे सोन्याचे भाव वाढणार का?

सध्या छत्तीसगडमध्ये ज्वेलरीचे हॉलमार्किंग करण्यासाठी 41 रुपए 30 पैसे लागतात. म्हणजे हॉलमार्किंगसाठी वस्तूंच्या नगाच्या आधारे पैसे घेतले जातात, वजनानुसार नाही. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होणार नाही. तसेच ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची गॅरंटी मिळेल.

घरात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे काय?

हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे घरात ठेवलेल्या जुन्या दागिन्यांचं काय? असा प्रश्नही लोकांना पडत आहे. सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, जुन्या दागिन्यांबाबत चिंता करण्याची गरज नाही. दागिन्यांवर नमुद असलेल्या कॅरेटनुसार सराफा व्यापारी सोन्याची खरेदी करतील. तसेच जुन्या दागिन्यांवरही गोल्ड लोन मिळेल.

Last Updated : Jun 18, 2021, 8:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.