भोपाळ/रतलाम Eight Crores Gold Seize : मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रिंगनोद पोलीस ठाण्यात रविवार सकाळी अचानक सोनं व्यापाऱ्यांनी गर्दी करायला सुरवात केली. व्यापारी पोलिस ठाण्यात का येत आहेत, हे कोणालाच समजू शकलं नाही. शेवटी पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सोन्याच्या तस्करीचं मोठे प्रकरण असल्याच सांगितलं. तेव्हा ही घटना उघडकीस आली. ईटीव्ही भारतनं या प्रकरणाची माहिती घेतली. संपूर्ण सोनं मुंबईहून रतलाम येथे आणण्यात आलं होतं. तेथून ते राजस्थान, गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पोहोचवलं जाणार होतं.
सोन्याच्या वीटा सापडल्या : दोन्ही डिलिव्हरी अज्ञात व्यक्तीदेखील रतलाममध्ये थांबल्या होत्या. यापैकी प्रवीण सैनी हा हरियाणाचा, तर दुसरा सुभाष वर्मा हा राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील आहे. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 100 पॅकेटमधील सोनं वेगवेगळ्या स्वरूपात सील करण्यात आलंय. काहींमध्ये सोन्याच्या वीटा, तर काहींमध्ये बिस्किटांच्या रूपात सोनं मिळालंय. तसंच वेगवेळ्या अनेक पॅकेटमध्ये दागिन्यांच्या स्वरूपात सोनंही होतं.
सोन्याची बनावट बिल : पोलिसांनी सांगितलं, हे 24 कॅरेट सोनं रतलाम शहरासह मंदसौर जिल्हा, नीमच जिल्हा, मध्य प्रदेशातील आगर जिल्ह्यात वितरित केलं जाणार होतं. काही पाकिटं राजस्थानच्या बांसवाडा येथेही पोहोचवली जाणार होती. तर गुजरातमधील काही शहरांमध्येही ते वितरित केलं जाणार होतं. सोन्याच्या तस्करीसाठी दोन्ही तस्करांनी संगणकावरून बनावट बिलेही तयार केली होती. यानंतरही रतलामच्या डझनभर व्यापाऱ्यांनी पुढे येऊन आपली बिलं खरी असल्याचा दावा केला आहे. तस्करांना पकडल्यानंतर पोलिसांनी जीएसटी, आयकरसह इतर विभागांना याची माहिती दिलीय.
शौकिनांसाठी परकीय चलन : चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेलं विदेशी चलन शौकिनांसाठी नेलं जात असल्याचं समोर आलंय. रतलामचे एसपी राहुल कुमार लोढा म्हणाले, "आम्हाला यात हवाला तस्करांचा हात असल्याची शंका आहे. सोन्यासोबत परकीय चलनाचा काय वापर आहे, असं विचारलं असता ते म्हणाले, "काही लोक परदेशी चलन घरी ठेवणं अभिमानाची आणि चैनीची बाब मानतात.
दशकातील सर्वात मोठी तस्करी: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्हा दोन राज्यांच्या सीमेला जोडलेला आहे. यामध्ये गुजरात, राजस्थानचा समावेश आहे. त्यामुळंच या जिल्ह्यात सातत्यानं सोनं, अफूच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. मात्र, शनिवारी पोलिसांनी पकडलेलं रॅकेट गेल्या दशकातील सर्वात मोठं असल्याचं बोललं जातंय. रतलामचं एसपी राहुल कुमार लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी त्यांना रिंगनोद पोलिस स्टेशनचे प्रभारी मयूर खंडेलवाल यांचा फोन आला. दोन लोक मुंबईहून मोठ्या प्रमाणात सोनं घेऊन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोन्याच्या तस्करीची माहिती मिळताच तातडीनं एक पथक तयार करण्यात आलं.
अशा प्रकारे पकडली सोन्याची तस्करी : या पथकानं स्टेशन रोड परिसरात नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. त्याच रस्त्यावर अचानक एक अॅक्टिव्हा दिसली. वाहन चालकानं हातात बॅग धरली होती. पोलिसांना वाहन चालकाचा संशय आल्यानं त्यांची चौकशी करून बॅगची झडती घेतली. त्यात डॉलर, दिरहम, रियाल या विदेशी चलनासह सोन्यानं भरलेले 100 हून अधिक पार्सल आढळून आले. दोघांनाही तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यानंतर सोन्याचं वजन केलं असता ते सुमारे 13 किलो 245 ग्रॅम असल्याचं समोर आलं. ज्याची किंमत सुमारे आठ कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर बॅगेत एक जीपीएस ट्रॅकर, विदेशी चलन डॉलर, दिरहम, रियाल देखील होतं. पकडले गेलेले दोन्ही आरोपी मध्यप्रदेशाबाहेरील आहेत. हे दोघेही सध्या रतलाम येथे राहत होते. याप्रकरणी दोघांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिलीय.
हेही वाचा -
- Beed Molestation News: अल्पवयीन मुलाने केला मालकाच्याच 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
- BJP Women Leader Murder Case : तो मृतदेह 'त्या' महिला नेत्याचा नाहीच! डीएनए चाचणीत धक्कादायक खुलासा
- Nagpur Hyderabad Highway Robbery : नागपुर-हैद्राबाद महामार्गावर गाडी अडवून लुटली साडेचार कोटींची रोकड; पाच आरोपींना अटक