ETV Bharat / bharat

Gold Smuggling : आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! सुरत विमानतळावर तब्बल 48 किलो सोन्याची पेस्ट जप्त - सोन्याची पेस्ट जप्त

सुरत विमानतळावरून तब्बल 48 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईहून येणारे चार प्रवासी पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत होते. डीआरआयने सुरतमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी खेप पकडली आहे.

Gold Smuggling
सुरत विमानतळावर सोन्याची तस्करी
author img

By

Published : Jul 9, 2023, 10:51 PM IST

सुरत : डीआरआयने (DRI) सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली आहे. अलीकडच्या काळात विमानतळांवरील सोन्याची ही सर्वात मोठी जप्ती आहे.

तब्बल 27 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त : अहमदाबाद आणि सुरत डीआरआयने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 27 कोटी रुपये आहे. चार प्रवाशांनी दुबईहून सामानात 48 किलो सोने पेस्टच्या स्वरूपात आणले होते. याची माहिती डीआरआय टीमला मिळताच त्यांनी कारवाई केली. डीआरआयने सुरतमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी खेप पकडली आहे.

पेस्टच्या रूपात सोन्याची तस्करी : डीआरआयला एक गुप्त टीप मिळाली होती. त्याच्या आधारे डीआरआयच्या टीमने शारजाहून सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या चार प्रवाशांची सखोल झडती घेतली. सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडे पेस्ट स्वरूपात 27 कोटी रुपयांचे सोने सापडले. हे सर्व प्रवासी मूळचे सुरत शहरातल्या रांदेर भागातील आहेत. अशा घटनेत रांदेर भागातील दोघांना यापूर्वीही अटक करण्यात आली आहे.

आरोपी रिमांडवर : विमान सुरत विमानतळावर लॅंड होण्यापूर्वीच डीआरआयचे सर्व अधिकारी विमानतळावर पोहोचले होते. हे सर्व प्रवासी विमानातून उतरल्यावर त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यात आली होती. त्यांची हँडबॅग स्कॅन करून त्यांना सोडण्यात आले. शनिवारी दिवसभर आरोपींची चौकशी करण्यात आली. आरोपींची डीआरआयच्या विशेष न्यायालयातून रिमांड घेण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर सर्वाधिक तस्करी : गेल्या काही वर्षांमध्ये देशात सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनानंतर सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये मुंबई विमानतळ अव्वल स्थानी आहे. येथून तब्बल 604 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. याच कालावधीमध्ये दिल्ली विमानतळावरून एकूण 374 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. सोने तस्करीत चेन्नई विमानतळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथून 306 किलो सोने जप्त केले गेले आहे.

हेही वाचा :

  1. Gold Smuggling Case: सोने तस्करीकरिता वाट्टेल ते... महिलेने चक्क गुप्तांगात लपवून आणलेले तब्बल २० लाख रुपयांचे सोने
  2. Gold Smuggling : दुरंतो एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी; डीआरआयने जप्त केले 7 कोटीचे सोने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.