मुंबई - सध्या लग्नसंमारंभाच्या सीझनमध्ये सोने दिवसेंदिव महाग होत असल्याचे दिसत आहे. लग्नसंमारंभामुळे सोन्याची मागणी जशी वाढली आहे तसा सोन्याचा दरही वाढलेला आहे. (New Rates Today Gold-Silver Prices ) आज मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे तर २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे. १६ एप्रिलच्या तुलनेत आज सोने काही ठिकाणी स्थिर दिसून आले तर काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. येत्या दिवसात सोने महाग होणार, हे निश्चित आहे. (todays gold rate update)
१ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी खालील प्रमाणे
- दिल्ली -₹4,955
- मुंबई - ₹4,955
- पुणे - ₹4,958
- नागपूर - ₹4,958
सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर - गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,८९० रुपये इतकी होती. आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.
सोन्याच्या दरात तेजी - भारतीय सुवर्ण बाजारात ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा ५६,२०० रुपये इतकी झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून, पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.
हेही वाचा - Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार! दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई