ETV Bharat / bharat

Goa Elections : लुझिनो फलेरो यांनी घेतली कोकणी भाषेतून खासदारकीची शपथ - कोकणी भाषेतून खासदारकीची शपथ

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो ( Former Goa Chief Minister Luizinho Faleiro ) यांना अखेर पश्चिम बंगालमधून राज्यसभा खासदारकी ( Rajya Sabha MP ) बहाल करण्यात आली. फलेरो यांनी आज (सोमवारी) संसदेत गोव्याच्या कोकणी भाषेतून शपथ ( Oath in Konkani Language ) घेतली.

लुझिनो फलेरो शपथ घेतांना
लुझिनो फलेरो शपथ घेतांना
author img

By

Published : Nov 29, 2021, 3:25 PM IST

Updated : Nov 29, 2021, 3:33 PM IST

पणजी - काँग्रेसमधून तृणमूलच्या वाटेवर चालणाऱ्या गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो ( Former Goa Chief Minister Luizinho Faleiro ) यांना अखेर पश्चिम बंगालमधून राज्यसभा खासदारकी ( Rajya Sabha MP ) बहाल करण्यात आली. फलेरो यांनी आज (सोमवारी) संसदेत गोव्याच्या कोकणी भाषेतून शपथ ( Oath in Konkani Language ) घेतली.

नवनियुक्त खासदार लुझिनो फलेरो शपथ घेतांना

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खासदारकी?

गोव्यातील प्रश्नांचा आवाज संसदेत उठवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले होते. गोव्यात दोन महिन्यात पक्ष विस्तार करण्यात फलेरो यशस्वी झाले. तृणमूलच्या गोव्यातील धमाकेदार एंट्रीने सत्ताधारी भाजपासह काँग्रेस पक्षही चिंताग्रस्त झाला. त्यातच फलेरो यांनी काँग्रेसमधील नाराजाना पक्षात आणून पक्ष विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच त्यांच्या कामाचे बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली असल्याची चर्चा आहे. फलेरो यांनी आज संसदेत चक्क कोंकणी भाषेतून शपथ घेत यापुढे गोव्याचा आवाज संसदेत घुमनार असल्याचे संकेत दिले आहे.

फलेरो यांचा राजकीय प्रवास

१९७९ मध्ये पहिल्यांदा न्हावेलीतून आमदार म्हणून निवडून आले होते.

१९७९ मध्ये न्हावेलीतून बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले होते.

१९९१ मध्ये कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते.

१९९९ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

२००३ पर्यंत सलग सहा वेळा आमदार झाले आहेत.

२००७ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिले. मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, कर्नाटक येथे स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केले. सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 2017 ला पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. सप्टेंबर महिन्यात आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 29 नोव्हेंबर 2021 ला खासदार म्हणून शपथ घेतली.

हेही वाचा - Winter Session of Parliament : अखेर लोकसभेत तीन कृषी कायदे रद्द, विरोधकांनी घातला गोंधळ

Last Updated : Nov 29, 2021, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.