पणजी : समुद्र किनाऱ्यावरील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना तरुणीचा आयपीएस अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची सोमवारी रात्री घडल्यानंतर गोवा विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार केली. त्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ. ए. कोआन असे त्या गृहमंत्रालयाने निलंबित केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ए कोआन हे गोव्यात पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत.
कलंगुटच्या नाईटक्लबमध्ये घडला प्रकार : दिल्ली येथील तरुणी फिरण्यासाठी गोवा येथे गेली होती. तर गोवा पोलीस दलात डीआयजी रँकवर कार्यरत असलेले डॉ. ए. कोआन यांनीही मौजमजा करण्यासाठी या नाईटक्लबमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ए. कोआन यांनी तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या तरुणीने ए. कोआन यांच्यासोबत वाद घातला. या वादाचा कथित व्हिडिओ सोशल माध्यमांवर आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
Ministry of Home Affairs ordered suspension of Indian Police Service (IPS) officer Dr A. Koan with immediate effect
— ANI (@ANI) August 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Dr A. Koan is 2009 batch AGMUT Cadre officer. There was allegation against him of molesting a woman at a night club in Goa pic.twitter.com/EsuEBGGMSc
">Ministry of Home Affairs ordered suspension of Indian Police Service (IPS) officer Dr A. Koan with immediate effect
— ANI (@ANI) August 16, 2023
Dr A. Koan is 2009 batch AGMUT Cadre officer. There was allegation against him of molesting a woman at a night club in Goa pic.twitter.com/EsuEBGGMScMinistry of Home Affairs ordered suspension of Indian Police Service (IPS) officer Dr A. Koan with immediate effect
— ANI (@ANI) August 16, 2023
Dr A. Koan is 2009 batch AGMUT Cadre officer. There was allegation against him of molesting a woman at a night club in Goa pic.twitter.com/EsuEBGGMSc
गोवा विधानसभेत गाजला मुद्दा : सध्या गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात गोवा पॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि भाजपाचे मायकल लोबो यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा सदनात उपस्थित केला. ए. कोआन या डीआयजी पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पर्यटक महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी सदनात केला. त्यामुळे गोवा विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली गृह मंत्रालयात तक्रार : गोवा विधानसभेत तरुणीच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या तक्रारीनंतर गृह मंत्रालयाने तात्काळ कारवाई करत ए कोआन यांना निलंबित केले आहे. त्यांना निलंबित करुन त्यांना गोवा पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आल्याची माहितीही प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पुढील आदेशापर्यंत गोवा पोलीस मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -