पणजी(गोवा) - 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सांगेचे आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar join Congress) यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनाना विधानसभा सचिवांकडे जमा केला. दुपारी राजीनामा देताच संध्याकाळी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) रणधुमाळी सुरू आहे.
- प्रसाद गावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश -
प्रसाद गावकर हे सांगेचे अपक्ष आमदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून जिंकली देखील होती. मागची 5 वर्ष अपक्ष म्हणून राहिल्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांचा वावर वाढला होता. मात्र रविवारी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपण मूळचे काँग्रेस कार्यकर्ते असून, मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट न मिळाल्यामुळे आपण अपक्ष निवडणूक लढलो, मात्र आज पुन्हा माघारी घरी परतल्याचे प्रसाद गावकर यांनी सांगितले.
- भाजपसमोरील आव्हाने वाढली
उपमुख्यमंत्री बाबू कवलेकर यांची पत्नी सावित्री कवलेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र भाजप माजी आमदार सुभाष फलदेसाई यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे फलदेसाई यांना तिकीट मिळाल्यास या मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फायदा प्रसाद गावकर पर्यायाने काँग्रेसला होऊ शकतो.
हेही वाचा - Goa Congress Candidate Second List : गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर