ETV Bharat / bharat

Vijai Sardesai : गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून विजयी - गोवा निडणूक निकाल विजय सरदेसाई

गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीचा निकाल आज लागला. गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Result Vijai Sardesai Goa Election
गोवा निडणूक निकाल विजय सरदेसाई
author img

By

Published : Mar 9, 2022, 5:08 PM IST

Updated : Mar 10, 2022, 12:47 PM IST

पणजी (गोवा) - पणजी (गोवा) - गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीचा निकाल आज लागला. गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Result Vijai Sardesai Goa Election
विजय सरदेसाई यांची कारकीर्द

एकेकाळी फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नकारल्यावर सरदेसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती व त्यात ते विजयी देखील झाले होते. नंतर त्यांनी गोवा फॉरवर्ड नावाचा पक्ष स्थापन केला. ते पर्रीकर सरकारमध्ये मंत्रीही होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसशी युती केली. ज्या काँग्रेसने एकेकाळी उमेदवारी नकरली होती तिच्याशी युती करून सरदेसाईंना गोव्याच्या सत्तेत वाटा मिळून जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल काय? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आता ते पूर्ण होईल की नाही येत्या काळात कळेल. सध्या विजय सरदेसाई हे फातोर्डातून विजयी झाले आहे. त्यामुळे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा ( Goa Election Result Date ) निकाल १० मार्चला लागणार आहे. ४० जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत ३०१ उमेदवारांनी भाग्य अजमावले. 78.94 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला कौल दिला आहे.

हेही वाचा - Goa Election 2022 : पणजीत उत्पल पर्रीकरांमुळे भाजपाची प्रतिष्ठा लागली पणाला..

सरदेसाई यांची कारकीर्द

राजकारणाबरोरच 'हा' व्यवसाय करतात

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांचा जन्म 14 जून 1970 रोजी झाला. ते सध्या फातोर्डा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जन्म ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना येथे जयवंत आणि लक्ष्मीबाई सरदेसाई यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील जयवंत हे कीटकशास्त्रज्ञ होते. ज्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सेवा केली होती. सविता केरकर आणि कै. माधवी सरदेसाई ही त्यांची भावंडे आहेत. सरदेसाई यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून १९९२ मध्ये कृषी विषयात विज्ञान शाखेची पदवी मिळवली आणि ते व्यवसायाने रिअल इस्टेट व्यापारी आहेत. विजय यांनी उषा सरदेसाई यांच्याशी लग्न केले आणि त्यांना उर्वी नावाची मुलगी आहे.

'या' दोन क्रिडा असोशिएशनचे अध्यक्ष

सरदेसाई हे प्रोग्रेसिव्ह गोवा रेसलिंग असोसिएशन आणि गोवा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सरदेसाई यांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. विजय यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गोव्याच्या विद्यार्थी राजकारणातून केली. ते गोवा विद्यापीठ विद्यार्थी परीषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकीय कारकिर्दीला काँग्रेसमधून सुरुवात केली आणि ते गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. सरदेसाई यांची मडगाव नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

..या घोटाळ्यात सहभागी असल्याचा होता आरोप

2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत विजय सरदेसाई यांना फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पदार्पण करताना ते प्रखर विरोधी नेतृत्व म्हणून उदयास आले. गोवा विधानसभेच्या सभागृहात आणि विधानसभेच्या बाहेरही त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे ते लोकप्रिय झाले. सरदेसाई यांनी 2015 मध्ये मडगाव नगरपरिषद निवडणुकीत पॅनेल उभे केले होते जे जिंकले होते. सरदेसाई यांच्यावर विरोधकांनी लुई बर्जर लाचखोरी घोटाळ्यात सहभागी असल्याचे आरोप केले होते. परंतु, हे आरोप सिद्ध झाले नाहीत.

2016 साली गोवा फॉरवर्ड पार्टी सुरू केली

25 जानेवारी 2016 रोजी त्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी सुरू केली. ते पक्षाचे मार्गदर्शक असले तरी पक्षांतरविरोधी कायद्यामुळे ते अधिकृतपणे पक्षात सामील झाले नव्हते. त्यांनी 16 जानेवारी 2017 रोजी पक्षात अधिकृत प्रवेश केला आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार म्हणून 2017 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाने केवळ चार मतदारसंघात निवडणूक लढवली आणि तीनमध्ये विजय मिळवला.

..या मोठ्या निर्णयामुळे समर्थकांसह अनेकांनी केली होती टीका

2017 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला 21 जागांचे अपेक्षित बहुमत मिळाले नाही. परंतु, काँग्रेस 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. सरदेसाई आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या इतर दोन आमदारांनी 13 जागा मिळविणाऱ्या भाजपला पाठिंबा दिला. मनोहर पर्रीकर यांची गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल या अटीवर त्यांनी हा पाठिंबा दिला होता. सरदेसाई यांची कारकीर्द भाजपविरोधी तत्त्वावर आधारित होती. तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह अनेकांनी टीका केली होती. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी गोव्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेला पाठिंबा दिल्यामुळे पक्षाला रामराम ठोकला होता.

गोव्यातील भाजप हा राष्ट्रीय भाजपपेक्षा वेगळा आहे आणि सरकार समान किमान कार्यक्रमानुसार काम करेल, असे त्यांनी नमूद केले होते. सरदेसाई यांनी दावा केला होता की ते सरकारमध्ये वॉचडॉग म्हणून काम करतील आणि त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला स्थिरता आणि विकासासाठी पाठिंबा दिला आहे. विजय सरदेसाई यांनी 14 मार्च 2017 रोजी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचवेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार, विनोदा पालिनेकर आणि जयेश साळगावकर यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

सध्या गोव्यात काँग्रेसला आकर्षक असा नेतृत्व करणारा चेहरा नाही. मात्र, सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती झाल्याने काँग्रसला राज्यात बळ मिळ्याची शक्यता आहे. 2017 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते तेव्हा सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला साथ दिली होती. भाजपच्या तत्वाला विरोध असताना देखील त्यांनी हे पाऊल उचलले आणि पर्रीकर यांची मुख्यंमंत्रिपदी विराजमान करण्याची मागणी धरत भाजपसोबत सत्ता स्थापिली. यंदाही अशी परिस्थिती उद्भवली तर आधीच युती असल्याने आणि सरदेसाईंच्या पक्षातील अधिक उमेदवार जिंकून आल्यास त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Goa Election 2022 : मायकल लोबो : सर्वात श्रीमंत उमेदवार.. गोव्यात सत्तास्थापनेत बजावणार महत्वाची भूमिका..?

Last Updated : Mar 10, 2022, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.